Join us
Daily Top 2Weekly Top 5

जॉन अब्राहमच्या 'फोर्स 2' चा पोस्टर रिलीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2016 11:06 IST

अभिनेता जॉन अब्राहमचा आगामी चित्रपट 'फोर्स 2' चा पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. 2011 मध्ये आलेल्या फोर्स चित्रपटाचा हा सिक्वेल आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - अभिनेता जॉन अब्राहमचा आगामी चित्रपट 'फोर्स 2' चा पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. 2011 मध्ये आलेल्या फोर्स चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. जॉन अब्राहमने सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्टर शेअर केला आहे. 'फोर्स 2' च्या निमित्ताने जॉन अब्राहम आणि सोनाक्षी सिन्हा प्रथमच एकत्र दिसणार आहेत.
 
फोर्स चित्रपटात जॉन अब्राहमने एका पोलीस अधिका-याची भुमिका निभावली होती. एसीपी यशवर्धनच्या भुमिकेतील जॉनला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली होती. त्यामुळे सिक्वेलमध्ये जॉन पुन्हा तीच भुमिका साकारताना दिसणार आहे.
 
फोर्सचं दिग्दर्शन निशिकांत कामतने केलं होतं. मात्र सिक्वेलच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अभिनय देवने सांभाळली आहे. एम एस धोनी चित्रपटाच्या रिलीजवेळी चित्रपटगृहांमध्ये 'फोर्स 2' चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात येणार आहे. 18 नोव्हेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे.