Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंका चोप्राचा दीर जो जोनास व सोफी टर्नरने शेअर केलेत हनीमूनचे फोटो, पाहाच!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 15:02 IST

प्रियंका चोप्राचा दीर जो जोनास आणि हॉलिवूड अभिनेत्री सोफी टर्नर यांचा शाही विवाह सोहळा अलीकडेच पार पडला. फ्रान्समध्ये झालेल्या या राजेशाही लग्नात प्रियंकाही मिरवताना दिसली. सध्या जो आणि सोफी दोघेही  मालदीवमध्ये हनीमूनला गेले आहेत.

ठळक मुद्दे2018 मध्येसोफी टर्नर आणि जो जोनसने इन्स्टाग्रामवर आपले नाते अधिकृतरित्या मान्य केले होते.

प्रियंका चोप्राचा दीर जो जोनास आणि हॉलिवूड अभिनेत्री सोफी टर्नर यांचा शाही विवाह सोहळा अलीकडेच पार पडला. फ्रान्समध्ये झालेल्या या राजेशाही लग्नात प्रियंकाही मिरवताना दिसली. सध्या जो आणि सोफी दोघेही  मालदीवमध्ये हनीमूनला गेले आहेत. दोघांनी सोशल मीडियावर त्यांच्या हनीमूनचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

व्हायरल होत असलेल्या या फोटोंमध्ये जो आणि सोफी हे कपल समुद्र  किनारी निसर्ग सौंदयार्चा आनंद घेताना दिसत आहेत. 

सोफीने शेअर केलेल्या फोटोत तिने फिकट गुलाबी रंगाची मोनोकनी घातली आहे. या मोनोकनीमध्ये ती फार सुंदर दिसत आहे.

हे जो आणि सोफीचे दुसरे हनीमून आहे. लास वेगास येथी पहिल्या लग्नानंतर दोघे कॅलिफोर्नियात फिरायला गेले होते. हे जो आणि सोफीचे दुसरे हनीमून आहे. लास वेगास येथी पहिल्या लग्नानंतर दोघे कॅलिफोर्नियात फिरायला गेले होते.

सोफी आणि जो ने मे महिन्यात लॉस वेगास येथे पहिल्यांदा गुपचुप लग्न केले होते. यानंतर या दाम्पत्याने लग्नाच्या प्रमाणपत्रासाठी सरकारकडे अर्ज सादर केला होता. अमेरिकी सरकारने मंजूरी दिल्यानंतर दोघेही ग्रँड लेव्हलवर दुस-यांदा लग्नबंधनात अडकले होते.

गत 30 जूनला जो आणि सोफी यांनी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत खिश्चन पद्धतीने  लग्न केले होते.

दोघांना नोव्हेंबर 2016 मध्ये प्री- एमटीव्ही युरोप म्युझिक अवॉर्ड्स कार्यक्रमात एकत्र पाहण्यात आले आणि यांच्या प्रेमाच्या चर्चा सुुरू झाल्या होत्या. यानंतर 2018 मध्येसोफी टर्नर आणि जो जोनसने इन्स्टाग्रामवर आपले नाते अधिकृतरित्या मान्य केले होते. आॅक्टोबर 2017 मध्ये त्यांनी साखरपुडा केला होता.

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास