Join us

ज्ॉकलीन दोन दिवस हॉटेलमध्ये बंद

By admin | Updated: October 28, 2014 00:18 IST

अभिनेत्री ज्ॉकलीन फर्नाडिस ही कॅनाडातील ओटावा येथे आपल्या आंतरराष्ट्रीय चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेली होती. यावेळी हॉटेलमधील आपल्या खोलीत ती दोन दिवस बंद होती.

अभिनेत्री ज्ॉकलीन फर्नाडिस ही कॅनाडातील ओटावा येथे आपल्या आंतरराष्ट्रीय चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेली होती. यावेळी हॉटेलमधील आपल्या खोलीत ती दोन दिवस बंद होती. ओटावातील पार्लमेंट स्ट्रीट परिसरात गोळीबाराच्या काही घटना घडल्या. दक्षतेचा उपाय म्हणून तेथील सरकारने शहर बंद ठेवण्याचे आदेश दिले. हल्लेखोर खुलेआम फिरत असल्याच्या पाश्र्वभूमीवर परिस्थिती निवळेर्पयत लोकांना आपल्या घरातच थांबण्याचे आदेश देण्यात आले होते. घटनास्थळ हे ज्ॉकलीनच्या हॉटेलपासून हाकेच्या अंतरावर होते. त्यामुळे ज्ॉकलीनला 48 तास हॉटेलबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली. या घटनेनंतर भारतातील नातेवाईकांनी तातडीने संपर्क साधून विचारपूस केली. आमचे शूटिंग यामुळे दोन दिवस बंद होते; परंतु परिस्थिती निवळल्यानंतर ते निर्विघ्नपणो पार पडल्याचे ज्ॉकलीनने सांगितले.