Join us

जितेंद्र जोशी बनला वासुदेव

By admin | Updated: June 13, 2016 02:54 IST

आताच्या मुलांना वासुदेव कोण आहे, का दिसतो हे माहीत नसते

आताच्या मुलांना वासुदेव कोण आहे, का दिसतो हे माहीत नसते; पण आपल्या परंपरा आपणच जपल्या पाहिजे आणि त्या जपण्याचा वाटा सेलिब्रिटींनी उचलला तर त्यांचा फरक लवकर जाणवितो. म्हणूनच आपला लाडका अभिनेता जितेंद्र जोशी आता लवकरच वासुदेवाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. कलर्स मराठी वाहिनीवर लवकरच १० एपिसोडची ‘संत ज्ञानेश्वर’ ही मालिका सुरू होणार आहे. यामध्ये जितू ‘वासुदेव’ची भूमिका साकारणार आहे. ‘उंच माझा झोका’चे दिग्दर्शक वीरेंद्र प्रधान यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले आहे. चला तर या मालिकेच्या निमित्ताने तरी लहान मुलांना वासुदेवाचे दर्शन घडणार आहे.