Join us
Daily Top 2Weekly Top 5

जान्हवी कपूर व ईशान खट्टरने लावलं ‘याडं’; गर्दी ‘झिंग झिंग झिंगाट’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2018 21:23 IST

जान्हवी कपूर व ईशान खट्टर यांच्या ‘धडक’ जोडीने पुण्यातील तरूणाईला अक्षरश: याडं लावलं. शुक्रवारी ‘लोकमत’ने पुण्यातील सिझन मॉलमध्ये आयोजित इव्हेंटमध्ये जान्हवी व ईशान येणार म्हटल्यावर तरूणाईचा उत्साह शिगेला पोहोचला. 

जान्हवी कपूर व ईशान खट्टर यांच्या ‘धडक’ जोडीने पुण्यातील तरूणाईला अक्षरश: याडं लावलं. शुक्रवारी ‘लोकमत’ने पुण्यातील सिझन मॉलमध्ये आयोजित इव्हेंटमध्ये जान्हवी व ईशान येणार म्हटल्यावर तरूणाईचा उत्साह शिगेला पोहोचला. इतका की, दुपारी तीन वाजतापासूनच हजारो चाहत्यांनी सिझन मॉलला वेढले. खरे तर जान्हवीचा हा पहिलाचं चित्रपट. पण  तिला पाहण्यासाठी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती.

 प्रत्येकाला जान्हवीची एक झलक पाहायची होती. ईशानचेही चाहते कमी नव्हते. या चाहत्यांमध्ये विशेषत: तरूणींचा भरणा होता. ईशान व जान्हवी मॉलमध्ये आलेत आणि सगळ्यांनी जान्हवी...जान्हवी...ईशान...ईशान... असे जोरजोरात ओरडणे सुरू केले. 

 

 लाईट पिंक कलरचा स्कर्ट आणि त्यावर व्हाईट टॉप घातलेल्या जान्हवीला पाहून तर प्रत्येकाच्या ‘दिलाची धडकन’ थांबली. पुढे तासभर लोकांनी जान्हवी व ईशान यांच्यासकट अख्खा मॉल डोक्यावर घेतला.

यावेळी जान्हवी व ईशानने ‘धडक’च्या गाण्यांवर ठेका धरला आणि गर्दीला जणू याडं लागलं...दोघांसोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दीची झुंबड उडाली. यावेळी ‘धडक’ने आनंदाने अनेक चाहत्यांसोबत सेलफी काढून घेतला.

पत्रपरिषदेत बोलताना ईशानने चाहत्यांच्या प्रचंड प्रतिसादाबद्दल आभार मानले. ‘धडक’च्या प्रमोशनच्या निमित्ताने आणि लखनौ, जयपूर अशा अनेक ठिकाणी गेलोत. प्रत्येक ठिकाणी आम्हाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. चाहत्यांसोबत असे प्रत्यक्ष भेटताना जाम मज्जा येतेय, असे ईशान म्हणाला. जान्हवीनेही त्याला दुजोरा दिला. आम्हाला चाहत्यांचे जितके प्रेम मिळतेय, तितकेच प्रेम आमच्या ‘धडक’ या चित्रपटालाही मिळावे, अशी अपेक्षा तिने बोलून दाखवली.

नागराज मंजुळे यांच्या गाजलेल्या सैराट या मराठी सिनेमाचा 'धडक' हा हिंदी रिमेक आहे. येत्या 20 जुलैला हा सिनेमा रिलीज करण्यात येणार आहे.

टॅग्स :धडक चित्रपट