Join us  

Shilpa Shinde : शिल्पा शिंदेनं ‘झलक दिखला जा 10’चा जज करण जोहरवर काढली भडास, नोरालाही दिला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 2:33 PM

Jhalak Dikhhla Jaa 10: शिल्पा शिंदे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता तिने ‘झलक दिखला जा 10’च्या जजेसवर भडास काढली आहे. हा शो जज करणाऱ्या करण जोहरवर ती बरसली. नोरा फतेही हिलाही तिने सोडलं नाही. 

‘भाभीजी घर पर है’ या मालिकेत अंगुरी भाभीची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली शिल्पा शिंदे (Shilpa Shinde) आपल्या परखड स्वभावासाठी ओळखली जाते. हीच शिल्पा शिंदे आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता तिने ‘झलक दिखला जा 10’च्या  (Jhalak Dikhhla Jaa 10) जजेसवर भडास काढली आहे. हा शो जज करणाऱ्या करण जोहरवर  (Karan Johar)ती बरसली. नोरा फतेही हिलाही तिने सोडलं नाही. शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने ‘झलक दिखला जा 10’च्या जजेला फैलावर घेतलं आहे. हा व्हिडीओ ‘झलक दिखला जा 10’च्या पॅनलवर बसलेल्या जजेससाठी आहे, असं हा व्हिडीओ शेअर करताना तिने म्हटलं आहे.

ती या व्हिडीओत म्हणते, ‘मी निया शर्माचा लास्ट परफॉर्मन्स पाहिला. तिला जे पॉइंट्स दिले गेले, तिच्या डान्स परफॉर्मन्सवर ज्या काही कमेंट्स केल्या गेल्यात, त्या ऐकूनही मी शांत होते. पण यावेळी परफॉर्मन्सनंतर जे काही झालं, ज्या काही कमेंट्स जजेसनी दिल्या ते बघता मला विचारावंस वाटतं की, करण सर (करण जोहर) धर्मा प्रॉडक्शनचा सिनेमा देणार आहे का?  3 मिनिटाच्या परफॉर्मन्समध्ये तुम्हाला डान्स दिसला नाही, असं तुम्ही म्हणता. तुम्हाला काहीतरी वेगळं हवं होतं, असं तुम्ही म्हणता. तुम्ही सेलिब्रेटी कंटेस्टंट घेता, पण तुम्हाला नेमकं हवं तरी काय? तुम्ही काय ऑस्कर वगैरे देणार आहात का? की नॅशनल अवार्ड देणार आहात? तुम्ही रूबीना दिलैकचा व्हिडीओ काढून पाहा.तिच्यासोबत कोणतीही दुर्घटना घडू शकली असते. असं झालं असतं तर त्याला जजेस जबाबदार असले का? झाल्यागेल्यावर मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर उतरण्यात काहीही अर्थ नाही. व्यक्ति आहे, तोपर्यंत त्याची पर्वा करा. नंतर भुंकू नका. माझी प्रेक्षकांनाही विनंती आहे. हा एंटरटेनमेंट शो आहे, त्याला त्याच पद्धतीने घ्या. फॅन्स आपआपआपसात लढत आहेत. आम्हा कलाकारांना माहित आहे की, आम्ही पाणी सुद्धा पिऊ शकत नाही. कारण सूसू येऊ नये. तुम्हाला 3 मिनिटांचा परफॉर्मन्स दिसतो. पण त्यामागे प्रचंड कष्ट असतात. माझी जजेसला विनंती आहे की, स्पर्धक जे काही करत आहेत, त्याचा आदर करा. त्यानुसार कमेंट्स द्या. मी ‘झलक दिखला जा 10’च्या विरोधात नाही. मला हा शो आवडतो. पण करण सरांना अजिबात डान्स येत नाही. तेव्हा त्यांनी कमेंट्स द्यायच्या तर किमान अशा गोष्टींवर तरी देऊ नये. डान्सनुसार कॉस्च्युम नाही तर त्यावर बोला, मेकअपवर बोला, सेटअपवर बोला. करण सर तुम्ही डान्सवर बोलूच कसं शकता? फक्त माधुरी मॅमला डान्सवर बोलण्याचा हक्क आहे. नोरा तू पण थोडी हिंदी शिकून ये. आम्ही आर्टिस्ट आहोत. येथून आम्हाला कोरिओग्राफर बनून बाहेर पायचं नाही. आम्ही जजेसचा आदर करतो पण याचा अर्थ हा नाही की तुम्ही आमचा अनादर कराल...’‘झलक दिखला जा 10’मधून शिल्पा शिंदे बाद झाली आहे. 

शिल्पा का संतापली?शिल्पा शिंदे इतकी का संतापली? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच तर याचं उत्तर आहे निया शर्माच्या परफॉर्मन्सवर जजेसच्या कमेंट्स. नियाने दिवाळी स्पेशल एपिसोडमध्ये काली मातेचं रूप धारण करून परफॉर्म केलं होतं. पण जजेसला तिचा हा डान्स अजिबात आवडला नाही. माधुरी दीक्षित, करण जोहर, नोरा फतेही तिन्ही जजेसनी नियाला कमी नंबर्स दिलेत. शिल्पाने याच पार्श्वभूमीवर ‘झलक दिखला जा 10’च्या जजेसला सुनावलं आहे. 

टॅग्स :शिल्पा शिंदेकरण जोहरनोरा फतेहीटेलिव्हिजन