Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बेहद' मालिकेच्या सेटला आग, कुशल टंडनने वाचवले जेनिफर विंगेटला

By admin | Updated: February 8, 2017 18:04 IST

सोनी टीव्हीवर दाखविल्या जाणा-या ‘बेहद’ मालिकेच्या सेटला शूटिंगदरम्यान आग लागली. यावेळी सेटवर अडकलेल्या अभिनेत्री जेनिफर विंगेटला या मालिकेतील प्रमुख

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.  08 - सोनी टीव्हीवर दाखविल्या जाणा-या ‘बेहद’ मालिकेच्या सेटला शूटिंगदरम्यान आग लागली. यावेळी सेटवर अडकलेल्या अभिनेत्री जेनिफर विंगेटला या मालिकेतील प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता कुशल टंडनने वाचविले. या आगीच्या दुर्घटनेत कुशल टंडन जखमी झाला आहे. 
‘बेहद’ मालिकेसाठी एका लग्नाच्या सीक्वेन्सचे शूटिंग चालू होते. मालिकेच्या कथानकानुसार या लग्नाच्या सीनमध्ये आग लागणार होती. त्याप्रमाणे आग लागली. मात्र ही आग अचानकच मोठ्या प्रमाणात पसरली. त्यामुळे याठिकाणी एकच गोंधळ उडाला. आग पसरल्यानंतर सेटवरुन सर्वजण पळून गेले. मात्र सेटवर जेनिफर विंगेट असल्याचे लक्षात येताच, त्या ठिकाणी कुशल टंडन धावत गेला आणि जेनिफर विंगेटला  वाचवले.
दरम्यान, याबाबत कुशलने ट्विट करुन चाहत्यांचे प्रार्थनांसाठी आभार मानले असून मानेला आणि पायाला दुखापत झाल्याचे त्याने सांगितले.