डोळ्यावर मोठा चष्मा लावून धडपडणारी ‘ती’ आजही रसिकांच्या मनात घर करून आहे. छोट्या पडद्यावरील ‘ती’ म्हणजे जस्सी... 2003 साली छोट्या पडद्यावर आलेल्या या जस्सीने रसिकांच्या मनात स्थान मिळवले होते. आता हीच जस्सी पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. कारण तसे संकेत खुद्द जस्सीची भूमिका साकारणाऱ्या मोना सिंग हिने दिले आहेत. मोना सिंगने ‘जस्सी’च्या भूमिकेला पूर्ण न्याय देत रसिकांची मने जिंकली होती. आता याच मालिकेचा दुसरा सीझन आला, तर त्यात भूमिका करायला नक्की आवडेल, असे मोना सिंग हिने सांगितले आहे. मोनाच्या या विधानामुळे जस्सीचे लवकरच कमबॅक होणार असे दिसतेय?.
‘जस्सी’चे छोट्या पडद्यावर कमबॅक?
By admin | Updated: June 12, 2016 01:19 IST