Join us

श्रीदेवी यांच्याप्रमाणेच जान्हवी कपूर करणार आता हे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 16:19 IST

श्रीदेवी आणि जान्हवीत साम्य असल्याचे नेहमीच म्हटले जाते.

ठळक मुद्देजान्हवी कपूरचा रुही हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ती डबल रोलमध्ये दिसणार आहे. रुही या चित्रपटाची गेल्या कित्येक महिन्यांपासून चर्चा आहे.

जान्हवी कपूरने तिच्या आईच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. तिने खूपच कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपले एक स्थान निर्माण केले आहे. आता आईच्या पावलावर पाऊल टाकून ती चित्रपटात डबल रोल साकारत आहे. श्रीदेवी त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये डबल रोल मध्ये दिसल्या होत्या. 

जान्हवी कपूरचा रुही हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ती डबल रोलमध्ये दिसणार आहे. रुही या चित्रपटाची गेल्या कित्येक महिन्यांपासून चर्चा आहे. या चित्रपटाचे स्क्रिनिंग नुकतेच जान्हवीने तिच्या जवळच्या लोकांसाठी आयोजित केले होते. त्यावेळी तिच्या असिस्टंटचे कुटुंब देखील आले होते. त्यावेळी ती तिच्या असिस्टंटच्या छोट्या मुलीसोबत खेळताना दिसली. 

जान्हवीचा या छोट्या मुलीसोबत खेळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एवढेच नव्हे तर तिने त्या लहान मुलीसोबत फोटो देेखील काढले. 

या चित्रपटात तिच्यासोबत राजकुमार राव मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात ''नदियों पार'' या जुन्या गाण्याला रिक्रीएट करण्यात आले आहे. 2004 साली नदियों पार गाण्याने सा-यांची पसंती मिळवत धुमाकूळ घातला होता. या गाण्याची तीच लोकप्रियता इनकॅश करण्याचा पुन्हा प्रयत्न करण्यात आला आहे. एकीकडे जान्हवीचे पहिले आयटम साँग असल्यामुळे तिच्या डान्सिंग अदा पाहून चाहतेही फुल ऑन फिदा झाले आहेत. खुद्द जान्हवीनेही तिच्या या लूकचे काही फोटो चाहत्यांसह शेअर केले होते. तिच्या या फोटोंना फॅन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत. या फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे.

टॅग्स :जान्हवी कपूरश्रीदेवी