छोट्या पडद्यावर रियालिटी शोमध्ये जजेस स्पर्धकांच्या गुणवत्तेची, कौशल्याची पारख करतात, त्यांना टीप्स देतात हे आपण पाहिलंय. मात्र कधीकधी ते स्पर्धकाच्या रंगात आणि त्यांच्या मस्तीतही न्हाऊन जातात. याचीच प्रचिती आली ती ‘वॉईस इंडिया किड्स’ या रियालिटी शोमध्ये. या शोमधील वाराणसीची स्पर्धक तान्या तिवारीनं आपल्या सुरांनी रसिक आणि शोच्या जजेसवर मोहिनी घातलीय. नुकतंच या शोमधील एका भागात तान्याच्या सुरेल परफॉर्मन्सने जज शेखर, शान आणि नीती असे काही प्रभावित झाले की त्यांनी तिला आपला आनंद अनोख्या पद्धतीने व्यक्त करण्यास सांगितलं. त्या वेळी गोड गळ्याच्या या चिमुकलीनं आपण ‘नागिन डान्स’ करणार असल्याचं सांगितलं. ही छोटी पठ्ठी एवढ्यावरच थांबली नाही. तिनं तर चक्क शेखर, शान आणि नीती यांनाही ‘नागिन डान्स’ करण्यासाठी आमंत्रित केलं. चिमुरडीनं विनंती केली म्हटल्यावर हे तिन्ही जजेसही स्वत:ला रोखू शकले नाहीत. त्यांनीही तान्याच्या आनंदात सहभागी होत नागिन डान्सवर ताल धरला.
जजेसही थिरकले‘नागिन डान्स’वर !
By admin | Updated: August 22, 2016 02:36 IST