Join us

राम-लखनच्या रिमेकमध्ये जॅकलीन

By admin | Updated: October 16, 2014 02:32 IST

सुभाष घई यांच्या राम-लखन या सुपरहिट चित्रपटाच्या रिमेकची घोषणा होताच बॉलीवूडमध्ये या चित्रपटातील कलाकारांबाबत चर्चा सुरू झाली आहे.

सुभाष घई यांच्या राम-लखन या सुपरहिट चित्रपटाच्या रिमेकची घोषणा होताच बॉलीवूडमध्ये या चित्रपटातील कलाकारांबाबत चर्चा सुरू झाली आहे. अर्जुन कपूरला लखनच्या भूमिकेसाठी साईन करण्यात आल्याची बातमी यापूर्वी सुरू होती, आता जॅकलीनलाही साईन करण्यात आल्याची चर्चा आहे. जॅकलीनने अभिनय केलेल्या किक या चित्रपटाला जबरदस्त यश मिळाले होते. जॅकलीन या चित्रपटात डिंपल कपाडिया यांनी निभावलेली भूमिका निभावणार असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटासाठी रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. राम-लखन बॉलीवूडच्या यादगार चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट जॅकलीनच्या करिअरसाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. या चित्रपटाची क्रेझ असण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे हा चित्रपट करण जोहर आणि रोहित शेट्टी बनवीत आहेत.