Join us
Daily Top 2Weekly Top 5

जॅकलिन फर्नांडिसच्या टीममधील 2 जण आढळले COVID-19 पॉझिटिव्ह, अभिनेत्रीही केली टेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 12:31 IST

सोशल मीडियाच्या माध्यमातून जॅकलिनने स्वत: ही माहिती दिली.

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या शूट क्रूमधील दोघे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. मात्र जॅककलिनची कोरोना टेस्ट नेगेटीव्ह आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जॅकलिनने स्वत: ही माहिती दिली. इन्स्टा स्टोरीवर जॅकने बीएमसीचे आभार मानले. 

दोनजण  COVID-19 पॉझिटिव्ह

जॅकलिनने लिहिले, आम्ही एका ब्रँडचे शूटिंग करणार होतो. यासाठी आम्ही सगळ्या क्रू मेंबर्सची कोरोना टेस्ट केली. त्यात  माझ्या क्रू मधले दोन लोक  COVID-19 पॉझिटिव्ह मिळाले. आम्ही शूटिंग पुढे ढकलले आहे कारण लोकांची सुरक्षा अत्यंत महत्वाची आहे. जे COVID-19 पॉझिटिव्ह मिळाले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.  

अलीकडेच जॅकलिनने महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील दोन गावे, पाथर्डी आणि सकुर दत्तक घेतली आहेत. तीन वर्षांच्या या परियोजनेदरम्यान या गावातील कुपोषित गावकऱ्यांना जेवण पुरवण्यात येणार आहे. यासाठी जॅकलिनने आपल्या या पालघर प्रोजेक्ट्साठी 'अ‍ॅक्शन अगेन्स्ट हंगर फाऊंडेशन'सोबत करार केला आहे. जवळपास 1,550 लोकांपर्यंत पोहोचता येणार असून गावकरी ज्यांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश असेल, त्यांच्या कुपोषणाची तपासणी केली जाईल.

टॅग्स :जॅकलिन फर्नांडिसकोरोना वायरस बातम्या