Join us

रहस्यमय असेल ‘कलर्स’वर आजची संध्याकाळ

By admin | Updated: June 24, 2017 01:16 IST

जेव्हा संध्याकाळी सात वाजता आपली आवडती मालिका ‘नागिन २’ मध्ये दिसेल प्रतिशोधाचे नवे वळण आणि संध्याकाळी आठ वाजता सुरू होईल एक नवी कथा ‘चंद्रकांता’ची.

जेव्हा संध्याकाळी सात वाजता आपली आवडती मालिका ‘नागिन २’ मध्ये दिसेल प्रतिशोधाचे नवे वळण आणि संध्याकाळी आठ वाजता सुरू होईल एक नवी कथा ‘चंद्रकांता’ची.चंद्रकांता : अद्भूत प्रेमाची मायावी गाथाही प्रेमगाथा आहे, एका जादूई जगातील सर्वांत अव्वल अय्यारा चंद्रकांता व तिला मारायला आलेल्या दुश्मन राष्ट्राच्या राजकुमार वीरा यांची.चंद्रकांता अशा राजकुमारीची कथा आहे, जी आपल्या स्वत:च्या ओळखीपासूनच अनोळखी आहे. तिला ठाऊक नाही की, तिच्याजवळ आहे एक अद्भूत शक्ती व एक तीलसमी खंजर, जो बनवू शकतो तिला शक्तिशाली.परंतु छल कपटी दुष्ट राणी इरावती या जादुई जगावर राज्य करू इच्छिते. इरावती आपला मुलगा राजकुमार वीरसह चंद्रकांताला मारण्याचे षडयंत्र रचते. तीलस्मी खंजर हासील करण्यासाठी आणि चंद्रकांताला मारण्यासाठी वीर निघतो विजयगडला. तिथे गेल्यानंतर त्याची भेट होते, एका अत्यंत सुंदर मुलीशी. तिला बघताच तो तिच्या प्रेमात पडतो. ती मुलगी दुसरी कोणी नसून चंद्रकांताच आहे. एका बाजूला वीर, जो ज्या मुलीला मारायला आला होता, तिच्याच प्रेमात पडला आहे आणि दुसरीकडे आहे चंद्रकांता, जिला हे सुद्धा माहीत नाही की, तिच्या ओळखीमुळेच वीर तिला मारायला आला आहे. काय होईल, जेव्हा चंद्रकांता आणि वीर यांचे सत्य एकमेकांसमोर येईल. कशी असेल त्यांची अद्भूत प्रेमाची मायावी गाथा. जाणून घेण्यासाठी बघा ‘कलर्स’ची नवी मालिका चंद्रकांता आजपासून प्रत्येक शनिवारी व रविवारी रात्री आठ वाजता.