Join us

अवघे पाऊणशे वयमान... तरी भारतीय महिलांना हवा अमिताभसारखा पती!

By admin | Updated: March 1, 2017 09:43 IST

वयाची सत्तरी पार केली तरी अमिताभ बच्चन याची जादू कायम असून भारतातील बहुसंख्य महिलाना त्यांच्यासारखाच पती हवा आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १ - वयाच्या ७४व्या वर्षीही बॉलिवूडचे शहेनशहा अर्थात बिग बी अमिताभ बच्चनना चित्रपटसृष्टीतील सर्वात बिझी कलाकार आहेत. अजूनही त्यांच्या हातात मोठमोठे प्रोजेक्ट्स असून दिग्दर्शक त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहेत. बच्चन यांचा करिश्मा फक्त पडद्यावरच नव्हे तर ख-या आयुष्यातही दिसून येतो, याचे कारण म्हणजे ' अवघे पाऊणशे वयमान' असतानाही अमिताभ बच्चन यांच्यावर अनेक जण फिदा असून भारतातील बहुसंख्य महिलांना बच्चन यांच्यासारखा पती हवा आहे. भारत मॅट्रिमोनीतर्फे  सोशल मीडियात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली असून बच्चन हे ' मॅन विथ मोस्ट डिझायर्ड क्वॉलिटीज' अर्थात ' सर्वात हवेसे, सर्वगुणसंपन्न' व्यक्ती असल्याचेही त्यात म्हटले आहे.
(‘‘हॅपिटायटिस बी’मुळे ७५ टक्के लिव्हर निकामी झाले - अमिताभ बच्चन)
(उघड्यावर शौचाला गेल्यास येऊ शकतो अमिताभ बच्चन यांचा फोन) 
 आयुष्याचा जोडीदार शोधताना पुरूष आणि स्त्रियांसाठी 'सर्वात महत्वाचा निकष' काय असतो हे जाणून घेण्यासाठी भारत मॅट्रिमोनीतर्फे हा सर्व्हे करण्यात आला होता.  आपल्या जोडीदारामध्ये कोणता गुण असावा हे नमूद करतानाच ' असा गुण असलेल्या एखाद्या सेलिब्रिटी कोणता हेही सहभागींना विचारण्यात आले होते. सर्व्हेत सहभागी झालेल्यांपैकी ६२.७ टक्के महिलांनी अमिताभ बच्चन यांची 'अनुरूप जोडीदार' म्हणून निवड केली. आपल्या जोडीदाराला समजून घेणारे आणि त्यांचा आदर करणारे बच्चन महिलांमध्ये लोकप्रिय असल्याचे दिसून आले. तर जोडीदाराचा ' आदर ' करणा-यांमध्ये शाहरूख खान आणि जोडीदाराला समजून घेण्याच्या कॅटॅगरीत भारताचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी दुस-या स्थानावर विराजमान झाले आहेत.
दरम्यान टीव्ही अभिनेत्री द्रष्टी धामी हिच्या लूक्समुळे पुरूषांनी तिला ' अनुरूप ' ठरवले असून ती अव्वल स्थानावर आहे. तर ७० महिलांनी ' हृतिक रोशनला' त्याच्या लूक्ससाठी पसंती दर्शवली. सर्वात मेहनती करणारी व्यक्ती म्हणून २५ टक्के सहभागींनी अभिनेता अक्षय कुमार तसेच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची निवड केली.