Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षावाल्याला समजलंच नाही ती विद्या बालन आहे

By admin | Updated: October 27, 2016 17:18 IST

अभिनेत्री विद्या बालनच्या ‘कहानी 2 : दुर्गा रानी सिंह’चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. ट्रेलरमध्ये विद्या बालन अतिशय दमदार दिसत आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचं पोस्टरही जारी केल होतं.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दी. 27 - अभिनेत्री विद्या बालनच्या ‘कहानी 2 : दुर्गा रानी सिंह’चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. ट्रेलरमध्ये विद्या बालन अतिशय दमदार दिसत आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचं पोस्टरही जारी केल होतं. सस्पेन्स आणि थ्रिलर अशा या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करतानाही विद्याने खास सस्पेन्स क्रिएट केलं. 
विद्या अत्यंत साध्या वेशभूषेत एका रिक्षातून जुहूच्या पीव्हीआरमध्ये पोहोचली. पूर्ण प्रवासात एकाही व्यक्तिने तिला ओळखलं नाहीच आश्चर्य म्हणजे ज्या रिक्षातून ती आली त्या रिक्षावाल्यानेही तिला ओळखलं नाही. पीव्हीआरसमोर पोहोचल्यावरही अनेकांच्या हे लक्षात नाही आलं की साधा सलवार सूट आणि स्वेटर घालून रिक्षातून उतरलेली महिला कोणी साधी व्यक्ती नसून चित्रपटाची मुख्य अभिनेत्री विद्या बालन आहे. 
विद्या रिक्षातून उतरून निघून गेल्यावर आपण ज्या व्यक्तिला सोडलं ती विद्या बालन होती हे रिक्षावाल्याला समजलं. त्यानंतर , लोकांना असं चकवण्यात मला खूप मजा येते असं विद्या म्हणाली. पाच वर्षांपूर्वी जेव्हा कहानी रिलीज झाला होता त्यावेळीही विद्याने एक गर्भवती महिला बनूनच चित्रपटाचं प्रमोशन केलं होतं.   
यापुर्वी ‘कहानी 2 : दुर्गा रानी सिंह’ 25 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार होता, मात्र गौरी शिंदे दिग्दर्शित ‘डियर जिंदगी’ 25 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असल्या कारणाने विद्याचा चित्रपट 2 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.