Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मायलेकी नव्हे बहिणीचं वाटताय'; पन्नाशी पार केलेल्या भाग्यश्रीच्या सौंदर्यापुढे लेकही पडतीये फिकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 17:50 IST

Bhagyshree: भाग्यश्रीने तिच्या लेकीसोबत एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 पहिल्याच सिनेमातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री (bhagyashree). 'मैंने प्यार किया' (maine pyar kiya) या सिनेमातूनभाग्यश्रीने कलाविश्वात पदार्पण केलं. विशेष म्हणजे या सिनेमामुळे ती रातोरात सुपरस्टार झाली. या सिनेमानंतर भाग्यश्री फार मोजक्या सिनेमांमध्ये झळकली. मात्र, आजही तिची लोकप्रियता कायम आहे. सोशल मीडियावर कायम तिच्या प्रोफेशनल लाइफसह वैयक्तिक जीवनाची चर्चा रंगत असते.  सध्या सोशल मीडियावर तिची आणि तिच्या लेकीची चर्चा रंगली आहे.

भाग्यश्री सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम तिच्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असते.यावेळी तिने तिच्या लेकीसोबतचा फोटो शेअर केला. या फोटोमध्ये दोघी मायलेकी कमालीच्या सुंदर दिसत आहेत. मात्र, नेटकऱ्यांनी या दोघींची तुलना करायला सुरुवात केली.

भाग्यश्रीच्या लेकीचं नाव अवंतिका असून ती सुद्धा आई इतकीच सुंदर दिसते. विशेष म्हणजे या दोघींचा फोटो पाहिल्यावर या मायलेकी आहेत असं कोणालाही वाटत नाही. त्यामुळे अनेकांनी त्यांची तुलना केली आहे. 'तुम्ही मायलेकी नाही तर बहिणी वाटता', असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, 'अहो भाग्यश्री मॅडम तुमचं वय वाढतंय की नाही,' 'तुम्ही दोघी बहिणीच वाटता', असं म्हणत अनेकांनी भाग्यश्रीचं कौतुक केलं आहे. दरम्यान, भाग्यश्रीने वयाची पन्नाशी पार केली आहे. मात्र, तिचा फिटनेस तिने योग्यरित्या सांभाळला आहे. योग्य डाएट, वर्कआऊट यांच्या जोरावर तिने स्वत:ला फीट ठेवलं आहे. 

टॅग्स :भाग्यश्रीसेलिब्रिटीसिनेमाबॉलिवूड