ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १३ - सर्वसामान्य युवतींनाच नव्हे तर ग्लॅमरस अभिनेत्रींनाही पाठलाग करणाऱ्या युवकांचा त्रास होतो. याचा प्रत्येय बॉलिवूडची बबली गर्ल श्रद्धालाही आला. श्रद्धा कपूर ही एका युवकाच्या पाठलाग करण्यामुळे प्रचंड वैतागली होती. तो युवक तिच्या प्रत्येक ठिकाणच्या कार्यक्रमांना तिला भेटण्यासाठी यायचा. दिवसभरात त्याने श्रद्धाचा चक्क १७ वेळा पाठलाग केला. श्रद्धाला ही गोष्ट खटकली तीने अनेक वेळेला त्याची नोंद घेतली. पण तिने त्याच्या विरूद्ध कधी अॅक्शन घेतली नाही.
दरम्यान, यारों की बारात या कार्यक्रमाला ती फरहान अख्तर सोबत गेली होती. तेव्हा तिथे तिने पुन्हा त्याच युवकाला पाहिले. मग तिने एक शक्कल लढवली. श्रद्धाने त्या व्यक्तीला स्टेजवर बोलवले आणि त्याला मिठी मारली. त्याची ओळख पण तिने तिचा पाठलाग करणारा युवक अशीच करून दिली. मग काय? त्याला पळता भुई थोडी झाली. सर्वांपासून तोंड लपवत तो कधी प्रेक्षकांमध्ये अदृश्य झाला हे कुणालाच कळलं नाही.