Join us
Daily Top 2Weekly Top 5

ईशा-पुनीतचे वाजले?

By admin | Updated: November 18, 2015 01:02 IST

‘सा ईज झीरो’, ‘हमशकल्स’ फेम अभिनेत्री ईशा गुप्ता आणि तिच्या बॉयफे्रं डमध्ये काहीतरी खटके उडाल्याच्या बातम्या सध्या बॉलीवूडमध्ये गाजत आहेत.

‘सा ईज झीरो’, ‘हमशकल्स’ फेम अभिनेत्री ईशा गुप्ता आणि तिच्या बॉयफे्रं डमध्ये काहीतरी खटके उडाल्याच्या बातम्या सध्या बॉलीवूडमध्ये गाजत आहेत. डायरेक्टर पुनीत मल्होत्रा आणि ती बऱ्याच दिवसांपासून रिलेशनमध्ये आहेत. वांद्रामध्ये दोघांच्या एका कॉमन फे्रंडने दिवाळीची पार्टी ठेवली होती. यात ईशा आणि पुनीत दोघेही आले. येताना आणि जाताना दोन्ही वेळेला ते एक टेच आले आणि गेले. पार्टीतही ते एकमेकांशी बोलले नाहीत. त्यामुळेच या दोघांच्यात काही वाजले का अशी शंक ा उपस्थितांना आली. कदाचित इतरांपासून त्यांचे नाते लपविण्यासाठी त्यांनी मुद्दामच असे केले असावे, असेही बोलले जाते.