Join us  

Isha Ambani : लाखमोलाची आहे अंबानींच्या लेकीची हॅंडबॅग, कियाराच्या लग्नात गुलाबी बॅगेचीच चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2023 1:07 PM

कियाराच्या लग्नाआधीच्या एका फंक्शनसाठी ईशा अंबानीने हजेरी लावली.

बॉलिवूडमध्ये सध्या लगीनघाई सुरु आहे. अथिया शेट्टीनंतर आता अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा आज लग्नबंधनात अडकणार आहेत. जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. लग्नात कडक सुरक्षाव्यवस्था तैनात आहे. याचं कारणंही तसंच आहे. मुकेश अंबानी यांची लेक ईशा अंबानी या लग्नात उपस्थित असणार आहे.ईशा आणि कियारा लहानपणीच्या मैत्रिणी आहेत.

ईशा अंबानीच्या हॅंडबॅगवर खिळल्या नजरा

कियाराच्या लग्नाआधीच्या एका फंक्शनसाठी ईशा अंबानीने हजेरी लावली. यावेळी तिच्यासोबत पती आनंद पिरामलही होते. विमानतळावरुन बाहेर पडतानाचा त्यांचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडिओत ईशा हसत हसत गाडीत बसताना दिसते. मात्र ईशाच्या हातात असलेल्या गुलाबी बॅगेकडे अनेकांची नजर जाते. या साध्या बॅगेची किंमत ऐकून तुम्ही देखील अवाक व्हाल.

लाखमोलाची आहे अंबानींच्या लेकीची हॅंडबॅग 

ईशा अंबानींची ही हॅंडबॅग 'हर्मीस पॅरिस' या लक्झरी ब्रॅंडची आहे. ही इतकी छोटी बॅगही लाखांची आहे. एप्सम लेदरपासून बॅग बनवण्यात आली आहे. 'केली २० मिनी सेलर बॅग' असं याचं नाव आहे.

याची किंमत ३८ हजार ५५० अमेरिकन डॉलर आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार याची बॅगेची किंमत तब्बल ३१ लाख ७० हजार रुपये इतकी आहे. याची किंमत ऐकून सर्वच अवाक झालेत. 

टॅग्स :ईशा अंबानीकियारा अडवाणीसिद्धार्थ मल्होत्रालग्नबॉलिवूड