साजीद खानचा ‘हमशकल्स’ किती वाईट आहे, याचा अंदाज याच एका प्रसंगावरून लावला जाऊ शकतो की, चित्रपटातील हिरोईन असलेल्या ईशा गुप्ताने तिच्या वडिलांना हा चित्रपट पाहू दिला नाही. ईशाने तिच्या कुटुंबियांनाही सक्त ताकीद दिली आहे की, तिच्या वडिलांना हा चित्रपट अजिबात पाहू देऊ नका. का? कारण ईशाला वाटते की, तिचे वडील हा चित्रपट पचवू शकणार नाहीत, हा चित्रपट त्यांच्या पाहण्यालायक नाही. चित्रपटात काम करणारी अभिनेत्री जर असे मानत असेल, तर मग सामान्य प्रेक्षकांनी तो का पाहावा? जे लोक हा चित्रपट पाहायला गेले होते, त्यांनाही हा चित्रपट रुचला नाही. साजीदने चित्रपटाची सक्सेस पार्टी दिली असली, तरी या चित्रपटाच्या निर्मात्यांना मात्र वीस कोटींचा तोटा झाला आहे. साजीद खानने लागोपाठ दोन फ्लॉप चित्रपट दिले आहेत.
ईशाने वडिलांना ‘हमशकल्स’ पाहू दिला नाही
By admin | Updated: July 3, 2014 13:52 IST