Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्रुती हसनने बॉयफ्रेंडसोबत गुपचूप उरकलं लग्न? 'ओरी' कडून चुकून झाला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 14:28 IST

श्रुती आणि तिचा बॉयफ्रेंड शांतनु हझारिका यांनी गुपचूप लग्न उरकल्याची चर्चा होऊ लागली आहे.

दक्षिणेपासून ते बॉलिवूडपर्यंत आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी ज्येष्ठ अभिनेत्री श्रुती हासन सध्या 'सालार' चित्रपटामुळे चर्चेत आहे. यातच अभिनेत्री तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आली आहे. पण आता अचानक श्रुती आणि तिचा बॉयफ्रेंड शांतनु हझारिका यांनी गुपचूप लग्न उरकल्याची चर्चा होऊ लागली आहे. याला कारण ठरला आहे बॉलिवूडसेलिब्रिटी ओरी (ओरहान अवत्रामणी). ओरीने आपल्या पोस्टमधून मोठा खुलासा केला आहे. 

न्यूज 18 च्या वृत्तानुसार ओरीने नुकतेच Reddit वर 'आस्क मी' हे सेशन घेतले. यावेळी त्याने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी एका चाहत्याने कोणत्या सेलिब्रिटीने तुझ्यासोबत फोटो काढण्यास नकार दिला आहे. नाव नाही सांगितले तरी चालेल फक्त एखादी हिंट दे, असा प्रश्न केला. यावर ओरी उत्तरात म्हणाला, 'श्रुती हासन...फोटोसाठी नाही. कारण, मी तिला तसे कधी विचारले नाही. पण एकदा एका इव्हेंटमध्ये मी तिला भेटलो होतो'. 

'तेव्हा ती माझ्याशी खूप वाईट वागली. त्या दिवसात मी तिला ओळखतही नव्हतो. मला खूप वाईट वाटले. पण कदाचित थोडा गैरसमज झाला असावा. मी तिच्या पतीशी चांगले वागलो होतो आणि त्याची प्रशंसाही केली होती. मी अफवा ऐकल्या होत्या की तिने मला स्पॉट बॉय समजले होते', असे ओरीने सांगितले. ओरीच्या या वक्तव्याने आता सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. संतनू हजारिका आणि श्रुती हासन यांनी गुपचूप लग्न केले की काय असा अंदाज सोशल मीडियावर चाहते लावत आहेत. 

श्रुती गेल्या काही काळापासून शांतनु हझारिकाला डेट करत असून ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. सोशल मीडियावर नेहमीच त्यांचे रोमॅंटिक फोटो ते शेअर करीत असतात. कोरोनाच्या काळात दोघे एकमेकांच्या जवळ आले,मैत्री झाली आणि मग एकमेकांना डेट करण्यास त्यांनी सुरुवात केली होती. शंतनू हजारिका हा एक डूडल कलाकार आहे. त्याने संगीत उद्योगातील रफ्तार, दिव्य, ऋत्विज सारख्या अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे.  

टॅग्स :श्रुती हसनसेलिब्रिटीबॉलिवूड