Join us
Daily Top 2Weekly Top 5

८ वर्षात मोडला पहिला संसार अन् पदरात १५ वर्षांचा मुलगा; आता दुसऱ्या लग्नानंतर बॉलिवूड अभिनेत्री पुन्हा गरोदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 09:14 IST

दुसऱ्या लग्नानंतर काहीच महिन्यांत बॉलिवूड अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, १५ वर्षांचा आहे पहिला मुलगा

'रईस' या सिनेमात शाहरुख खानबरोबर स्क्रीन शेअर करून प्रसिद्धीझोतात आलेली पाकिस्तानी अभिनेत्री म्हणजे माहिरा खान. माहिराने अल्पावधीतच बॉलिवूडमध्येही स्थान मिळवलं. पण, बॉलिवूडमधील करिअरपेक्षा माहिरा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वीच माहिराने दुसरं लग्न करत पुन्हा संसार थाटला होता. दुसऱ्या लग्नाच्या काहीच महिन्यांनंतर आता ती पुन्हा गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 

माहिरा खानने ऑक्टोबर २०२३मध्ये सलीम करीमशी लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ईटाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आता माहिरा दुसऱ्यांदा गरोदर असल्याचं बोललं जात आहे. प्रेग्नन्सीमुळेच तिने काही प्रोजेक्टमधूनही काढता पाय घेतल्याचं समजत आहे. रिपोर्टनुसार, माहिरा ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. त्यामुळे तिने कामातून ब्रेक घेतला आहे. पण, अद्याप याबाबत माहिरा आणि सलीमकडून कोणतंही भाष्य करण्यात आलेलं नाही. 

माहिराने २००७मध्ये अली अकसारी याच्याबरोबर लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. २००९ मध्ये गोंडस बाळाला जन्म देत ती पहिल्यांदा आई झाली. पण, लग्नानंतर ८ वर्षांतच त्यांचा सुखी संसार मोडला. त्यांना १५ वर्षांचा मुलगा आहे. त्यानंतर २०२३मध्ये माहिराने सलीम करीमशी विवाह करत नव्याने संसार थाटला. आता ती दुसऱ्यांदा गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.  

टॅग्स :माहिरा खानसेलिब्रिटीगर्भवती महिला