इ रफान खान आगामी ‘मदारी’ नावाच्या सिनेमात काम करत आहे. निशिकांत कामत दिग्दर्शित हा चित्रपट २०१२ साली मुंबईतील मरोळ भागात मेट्रो रेल्वे पू्ल कोसळण्याच्या घटनेवर हा चित्रपट आधारित आहे. इरफान यामध्ये एका समाजहीतवाद्याची भूमिका करणार आहे. निशिकांतने पटकथेतसाठी व्यापक संशोधन केले असून, जास्तीत जास्त वास्तववादी चित्रपट बनविण्याची त्याची इच्छा आहे. तो सांगतो की, ‘अनेक सत्य घटनांवर आधारित ही कथा आहे. अतिशय संवेदनशीलपणे चित्रण करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. पुढच्या आठवड्यात चित्रपटाचा ट्रेलर लाँच होण्याची शक्यता आहे.’
‘मदारी’मध्ये इरफान
By admin | Updated: May 8, 2016 02:34 IST