सध्या कलाकारांचे सोशल अकाऊंट हॅक करण्याचे प्रमाण वाढत चालले असल्याचे पाहायला मिळतेय. काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्री अक्षय्या देवधर हिचे अकाऊंटदेखील हॅक करण्यात आले होते. या अभिनेत्रीच्या पाठोपाठ प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री संस्कृती बालगुडेचेदेखील इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्यात आले आहे. यामुळे ती खूपच चिडलेली आहे. या अकाऊंट हॅकविषयी संस्कृती लोकमत सीएनएक्सला सांगते, ‘अकाऊंट हॅक करणे ही खूप चुकीची गोष्ट आहे. हॅक करणाऱ्या व्यक्तीला खूप मजा वाटते. मात्र, सोशल मीडिया हे लोकांपर्यंत पोहोचण्याचे सोयीस्कर माध्यम आहे, म्हणून आम्ही सगळे कलाकार कामाच्या व्यापातून वेळ काढून इतक्या मेहनतीने व प्रत्येकजण आपले सोशल अकाऊंट मेंटेन करत असतो. त्यासाठी अतोनात मेहनत करत असतो. म्हणूनच ज्या कु णी व्यक्तीने माझे अकाऊंट हॅक केले असेल, त्या व्यक्तीला मी असे सरळ साध्या पद्धतीने सोडणार नाही. त्या व्यक्तीची मी कायदेशीर पद्धतीने तक्रार करणार आहे. सध्या मी ती प्रोसेस पूर्ण करत आहे. तसेच मी सर्वांना अलर्ट केले आहे. मात्र, हा सर्व प्रकार पाहून मी स्वत:देखील खूपच भावनिक झाले आहे.’
संस्कृतीचे इन्स्टाग्राम अकाऊं ट हॅक!
By admin | Updated: February 10, 2017 03:36 IST