Join us
Daily Top 2Weekly Top 5

असे आहे प्रियंका चोप्रा व निक जोनासचे ‘ड्रिम होम’; पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 12:07 IST

इनसाईड फोटो...

ठळक मुद्दे२० हजार स्क्वेअर फुटांच्या या घरात ७ बेडरूम आहेत.

लग्न झाल्यानंतर प्रियंका चोप्रा आपल्या संसारात आनंदी आहे. अमेरिकन सिंगर निक जोनास आणि प्रियंका दोघेही वैवाहिक आयुष्य एन्जॉय करत आहेत. लग्नानंतर प्रियंका व निक आपल्या ड्रिम हाऊसमध्ये शिफ्ट झालेत. या घराची झलक प्रियंका व निकच्या सोशल मीडियावरच्या फोटोंमध्ये तुम्ही बघितली असेलच. आज या घराचे काही इनसाईड फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

लॉस एंजलिसमधील सॅन फनांडो व्हॅलीमध्ये प्रियंका व निकचा टुमदार बंगला आहे. या घराची किंमत साधारण १४४कोटी रुपये इतकी असल्याचे कळते.

 या दोघांनी लॉस एंजलिसमधील सॅन फनांडो व्हॅलीमध्ये नवा मॅन्शन घेतला आहे. त्यांच्या या नव्या घराची किंमत २० मिलियन डॉलर्स, म्हणजे साधारण १४४ कोटी रुपये सांगितले जात आहे.

२० हजार स्क्वेअर फुटांच्या या घरात ७ बेडरूम आहेत. फनांडो व्हॅलीचे सुंदर दृश्य या घरातून दिसते. घराबाहेर सुंदर स्वीमिंग पूलही आहे.  याशिवाय घरामध्ये बॉलिंग ऑले, थिएटर, बास्केटबॉल कोर्ट, लाउंज एरिया,जिम आदी सुविधाही आहेत. या घराजवळ निकचा थोरला भाऊ जो जोनास याचेही घर आहे. 

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास