Join us
Daily Top 2Weekly Top 5

इंदू-अधूच्या संसारात गोपाळचं परतणं ठरणार नव्या संकटाची सुरूवात, 'इंद्रायणी' मालिकेत नाट्यमय वळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 17:17 IST

'इंद्रायणी' मालिकेत नवं वळण येणार आहे. इंदू-अधूच्या संसारात गोपाळची नाट्यमय एन्ट्री झाली आहे.

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका 'इंद्रायणी' सध्या नाट्यमय वळणावर येऊन पोहोचली आहे. प्रेक्षकांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आणि इंदू-अधूचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं. मात्र, लग्नानंतर लगेचच त्यांच्या संसारावर संकटांची मालिका सुरू झाली आहे. इंदू आणि अधूच्या नात्याला आनंदीबाई आणि गोपाळने मोठं आव्हान दिलं आहे. गोपाळ आणि आनंदीबाई दोघांचंही ठाम मत आहे "हा संसार सुखाचा होऊ द्यायचा नाही." हे आव्हान इतक्यावरच थांबत नाही.

गोपाळ अनेक वर्षांनी दिग्रसकरांच्या वाड्यात परत येतो आहे आणि तेही कायमस्वरूपी! कारण? शंकुतलाला झालेला पोटाचा कॅन्सर. तिच्या उपचारांची जबाबदारी गोपाळ घेतो आणि त्यातूनच तो पुन्हा घरात पाय ठेवतो. पण त्यामागे आहे एक गूढ हेतू इंदू-अधूचा नव्याने सुरू झालेला संसार उध्वस्त करणे.एकीकडे इंदू तिच्या संसारासाठी झगडते आहे, तर दुसरीकडे अधूवर झालेला जीवघेणा हल्ला त्यांचं नातं अधिक घट्ट करत जातो.

देवदर्शनाला गेले असताना अधूवर हल्ला होतो पण त्या कठीण प्रसंगात दोघंही एकमेकांच्या साथीनं ती वेळ पार करतात. अधूचा रुसवा दूर होतो आणि नव्याने संसार सुरू होतो.  पण या सुरुवातीलाच गोपाळचं परतणं आणि त्यात आनंदीबाईंची साथ – हे सर्व गोष्टी पुन्हा एकदा वादळाची चाहूल देतात. गोपाळ आपल्या प्लॅनमध्ये यशस्वी होणार का? इंदू आणि अधू हे नवं आव्हान कसं पार करतील? त्यांच्या नात्याची कसोटी यातून कशी लागेल? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला इंद्रायणी मालिका बघावी लागेल. ही मालिता आता रविवारी दुपारी २९ जून, दु. १ आणि संध्या ७ वा. कलर्स मराठीवर बघायला मिळेल.

टॅग्स :कलर्स मराठीटेलिव्हिजनमराठी अभिनेता