Join us
Daily Top 2Weekly Top 5

व्यक्तिरेखा माझ्यासाठी महत्त्वाची!

By admin | Updated: May 31, 2017 05:15 IST

छोट्या पडद्यावर गेल्या दशकाहून अधिक काळ विविध भूमिकांच्या माध्यमातून अभिनेता शालिन भानोतनं रसिकांची मनं जिंकली आहेत. अनेक

- Suvarna Jain -छोट्या पडद्यावर गेल्या दशकाहून अधिक काळ विविध भूमिकांच्या माध्यमातून अभिनेता शालिन भानोतनं रसिकांची मनं जिंकली आहेत. अनेक मालिकांमधून त्यानं आपल्या अभिनयाची झलक दाखवून दिली. काही महिन्यांपूर्वी एका मालिकेत त्यानं दुर्योधनची आव्हानात्मक भूमिका लीलया साकारली होती. आता पुन्हा एकदा असाच काहीसा प्रयत्न त्याने केला आहे. एका नव्या ऐतिहासिक व्यक्तीरेखा असलेल्या मालिकेत शालिन झळकत आहे. या मालिकेत तो रणजितसिंग यांचे वडील महासिंग यांची भूमिका साकारत आहे. या मालिकेतून महाराजा रणजित सिंग यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास उलगडला जाणार आहे. याच निमित्ताने शालिन भानोत याच्याशी साधलेला हा संवाद... तुझ्या मते, या मालिकेचं प्रमुख वैशिष्ट्य काय आहे असं तुला वाटतं?रसिकांना पहिल्यादांच काहीतरी हटके पाहायला मिळत आहे. या मालिकेतील व्यक्तीरेखांची वेशभूषा, तलवारी, शिरस्त्राण, पगड्या, दागदागिने या सगळ्या गोष्टी आतापर्यंत छोट्या पडद्यावर दाखवण्यात आलेल्या सर्व मालिकांपेक्षा हटके आणि पूर्णत: वेगळ्या आहेत. ‘सावरियाँ’ आणि ‘ब्लॅक’ या सिनेमांसाठी सेट उभारणाऱ्या उमंगकुमार यांनी या मालिकेसाठी भव्यदिव्य असे सेट साकारले आहेत. ही मालिका असली तरी ती पाहताना तुम्हाला एखादा सिनेमाच पाहात असल्याची अनुभूती मिळते आहे. शिवाय महाराजा रणजितसिंग यांची शिकवण आणि त्यांची मूल्यं याचाही प्रसार या मालिकेच्या माध्यमातून होत आहे. या मालिकेची कथा आणि भव्य सादरीकरण ही सुद्धा त्याची खास बात आहे. याआधीही मी ऐतिहासिक मालिका केल्या आहेत. मात्र ही मालिका उच्च स्तरावरील मालिका आहे.कायम तुझ्या आणि दलजीतच्या नात्याबाबत प्रश्न उपस्थित केले जातात. अशा प्रश्नांना तुझं काय उत्तर असतं?माझ्यात आणि दलजीतमध्ये आता सारं काही ठीक आहे. ती एक चांगली व्यक्ती आहे आणि माझ्या आयुष्याचा हिस्सा बनल्याबद्दल मी तिचा कायम आभारी राहीन. आम्ही खूप सुंदर क्षण एकत्र अनुभवले असून ते क्षण त्या आठवणी आयुष्यभर हृदयात राहतील. याशिवाय जेडन हा आमच्या दोघांच्याही आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. काही दिवसांपूर्वी तिला ट्विटरच्या माध्यमातून त्रास देणाऱ्या लोकांना मी चांगलंच खडसावलं. माझ्या कुटुंबाचा अपमान करण्याचा अधिकार कुणालाच नाही. दलजीत माझ्या कुटुंबाचा महत्त्वाचा भाग आहे आणि कायम राहिन. तिच्याबद्दल माझ्या मनात वाईट कधीच नव्हते. स्नेहा वाघ आणि तुझ्यातील शीतयुद्धाबाबत काय सांगशील? खरंच तुमच्या दोघांत आलबेल आहे?मी सेटवर एका ठराविक गरजेपलिकडे बोलतच नाही. तेच नियम स्नेहासाठीही लागू आहेत. मला तिच्यासोबत काम करण्यात कोणतीही अडचण नाही. उलट तिच्यासोबत काम करायला काहीच समस्या नाही. उलट तिच्यासोबत काम करायला मला मिळत आहे याचा मला आनंद आहे. मी एक छान अभिनेत्री आहे. आमची आॅनस्क्रीन केमिस्ट्रीही चांगली असून रसिकांनाही ती भावते. यापलीकडे मला विषयावर काही बोलायचे नाही. तुझ्या आगामी प्रोजेक्टविषयी जाणून घ्यायला आवडेल?ही मालिका प्रचंड यशस्वी करणं हीच माझी सध्याची आणि भावी योजना आहे. ही नेहमीच्या पठडीतील एका योद्धयाची आणि राजाची कथा नाही, त्यामुळे प्रेक्षकांचा प्रतिसाद खूप चांगला मिळतो आहे. याच गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या होत्या. ही भूमिका करताना खूप मजा आली.