Join us

HOTNESS ALERT : हार्दिक पांड्याला ‘क्लिन बोल्ड’ करणा-या ‘बोल्ड’ नताशाचे बिकिनी फोटो व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 13:08 IST

होय, नताशाचे बिकिनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

ठळक मुद्देनताशा ही रिअ लाईफइतकीच रिअल लाईफमध्येही कमालीची बोल्ड आहे

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी क्रिकेटर हार्दिक पांड्याने गर्लफ्रेन्ड नताशा स्टँकोव्हिचसोबत साखरपुडा करून सर्वांना आनंदाचा धक्का दिला. साखरपुड्याची गोड बातमी हार्दिकने स्वत: चाहत्यांसोबत शेअर केली आणि त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला. त्यामुळे त्यादिवशी अगदी दिवसभर हार्दिक पांड्या हे नाव सोशल मीडियावर ट्रेंड करत होते. पण सध्या हार्दिकची भावी पत्नी नताशाचे नाव ट्रेंड करतेय. होय, नताशाचे बिकिनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

एक दिवस आधी नताशाने हे फोटो स्वत: इन्स्टाग्रामवर शेअर केलेत आणि या फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला. यातील पहिल्या फोटोत नताशा स्विमिंगपूलमध्ये पोज देताना दिसतेय.

तर तिस-या फोटोत समुद्र किना-यावर फेरफटका मारताना दिसतेय. या फोटोत नताशा कमालीची हॉट दिसतेय. 18 तासांत नताशाचे फोटो लाखो लोकांनी शेअर केलेत.

 नताशा ही एक सर्बियन मॉडेल, डान्सर आणि अभिनेत्री आहे. ‘बादशाह’ या म्युझिक व्हिडीओत डीजे वाले बावू या गाण्याने नताशाला प्रसिद्धी मिळवून दिली.

इमरान हाश्मीच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द बॉडी’ या सिनेमात गाण्यात नताशा आयटम सॉन्ग करताना दिसली होती. 2018 मध्ये प्रदर्शित ‘झिरो’ या सिनेमात तिने एक छोटीशी भूमिका साकारली होती. त्यापूर्वी सत्याग्रह, फुकरे रिटर्न, डॅडी या सिनेमात तिने आयटम नंबर केले होते.

नच बलिए आणि बिग बॉसच्या 8 व्या सीझनमध्येही ती सहभागी झाली होती. नताशा ही रिअ लाईफइतकीच रिअल लाईफमध्येही कमालीची बोल्ड आहे. तिने इन्स्टाग्राम अकाऊंट तिच्या  बोल्ड व हॉट फोटोंनी भरलेले आहे. हीच बोल्ड नताशा आता पांड्या कुटुंबाची सून होणार आहे.

  

टॅग्स :हार्दिक पांड्यानताशा दलाल