मागील वर्षी रिलीज झालेल्या चश्मेबद्दूर या चित्रपटासाठी अली जफरला त्याचे वजन घटवावे लागले होते. आता मात्र त्याला किल दिल या आगामी चित्रपटासाठी वजन वाढवावे लागले आहे. साधारणपणो अनेक अभिनेत्यांना त्यांचे वजन कमी करावे लागते, पण शाद अलीचे दिग्दर्शन असलेल्या किल दिलसाठी अलीला तब्बल आठ किलो वजन वाढवावे लागले. याबाबत अली सांगतो की, चश्मेबद्दूरमध्ये महाविद्यालयीन तरुण दिसण्यासाठी मला वजन घटवावे लागले होते; पण किल दिलसाठी मला एक मॅच्युअर आणि मसल्स असलेल्या लूकची गरज होती, त्यामुळे मला जीममध्ये खूप घाम गाळावा लागला. आता माङो वजन 73 किलो झाले आहे. पुढेही तीन किलो वजन कमी करून 7क् किलो वजन राखण्याचा माझा प्रयत्न असेल. जास्त मसल्स असलेला लूकही तेवढाचा चांगला दिसत नाही.’