Join us
Daily Top 2Weekly Top 5

इमरान-राजकुमारचा अबोला

By admin | Updated: November 19, 2014 09:01 IST

‘हमारी अधुरी कहानी’च्या सेटवर सिरीयल किसर इमरान हाश्मी आणि राजकुमार राव एकमेकांशी बोलताना दिसत नाहीत.

‘हमारी अधुरी कहानी’च्या सेटवर सिरीयल किसर इमरान हाश्मी आणि राजकुमार राव एकमेकांशी बोलताना दिसत नाहीत. सूत्रांनुसार ‘हमारी अधुरी कहानी’चे शूटिंग सध्या परदेशात सुरू आहे. चित्रपटात इमरानसोबत राजकुमार रावही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. त्याशिवाय विद्याही मुख्य भूमिकेत दिसेल. राष्ट्रीय पुरस्कार विजेता असलेल्या राजकुमार रावच्या अभिनयामुळे इमरान स्वत:ला असुरक्षित समजत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळेच तो राजकुमारपासून लांब राहताना दिसतो. इमरान राजकुमार रावशी अजिबातच बोलत नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे, त्याशिवाय राजकुमारही इमरानशी बोलण्याचा प्रयत्न करीत नाही.