Join us

इम्पाची पाकिस्तानी कलाकारांना नो एंट्री, 'रईस' आणि 'ए दिल है मुश्किल' चित्रपट अडचणीत

By admin | Updated: September 30, 2016 08:17 IST

इम्पाची ७७वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली असून यामध्ये कुठल्याही पाकिस्तानी कलाकाराला यापुढे काम न देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 29 : भारत-पाकिस्तानचे सध्याचे संबंध लक्षात घेता इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर असोसिएशन अर्थात इम्पाची ७७वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली असून यामध्ये कुठल्याही पाकिस्तानी कलाकाराला यापुढे काम न देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.मनसेने उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांनी भारतातून निघून जाण्याचा इशारा दिल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांनी भारतातून काढता पाय घेतला होता. आता इम्पानेही घेतलेल्या या कठोर निर्णयामुळे शाहरुखच्या 'रईस' आणि करण जौहरच्या 'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमांचं भवितव्य धोक्यात आलं आहे. या दोन्ही सिनेमांमध्ये पाकिस्तानी कलाकारांच्या भूमिका आहेत.