Join us

मी टाइमपास रिलेशनशिपसाठी तयार - कंगना

By admin | Updated: June 15, 2015 12:47 IST

मी टाइमपास म्हणून रोमान्स करण्यास तयार असून लिव्ह इन रिलेशनशिपलाही माझी हरकत नाही असे बेधडक मत अभिनेत्री कंगना राणावतने मांडले आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १५ - मी टाइमपास म्हणून रोमान्स करण्यास तयार असून लिव्ह इन रिलेशनशिपलाही माझी हरकत नाही असे बेधडक मत अभिनेत्री कंगना राणावतने मांडले आहे. 

क्वीन, तनू वेड्स मन्नू रिटर्न्स या चित्रपटांना घवघवीत यश मिळाल्यावर कंगना राणावतचा कट्टी बट्टी हा चित्रपट झळकत आहे. या चित्रपटात कंगनाने आधुनिक विचारसरणी असलेल्या तरुणीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटानिमित्त कंगनाने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कंगना म्हणते, जेव्हा तुम्ही टाइमपास म्हणून एखाद्याला डेट करता, त्यावेळी तुमच्या डोक्यात लग्नाचा विचार नसतो, कारण तुमच्यात या नातेसंबंधाची जाणीव नसते. मी टाइमपास म्हणून रोमांस करण्यासाठी तयार आहे असे रोखठोक मत तिने मांडले. 

लिव्ह इन रिलेशनशिपविषयीही कंगना म्हणते, मी लिव्ह इन रिलेशनशिपचे समर्थन करते. समोरचा व्यक्ती तुमच्याशी कसं वागतो यावर हे अवलंबून असते. जर दोघांचा एकमेकांवर विश्वास असेल तर त्यांनी हे रिलेशन आणखी एक पाऊल पुढे नेण्याची गरज आहे असे तिने म्हटले आहे. कट्टी बट्टी या सिनेमातही कंगनाने डबल रोल केला असून अभिनेता इम्रान खान तब्बल दीड वर्षांनी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.