Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘मी प्रेग्नंट नाही, त्या अफवाच!’

By admin | Updated: June 11, 2016 02:31 IST

स ध्या संपूर्ण बॉलीवूड इंडस्ट्रीचे लक्ष बेगम आॅफ पतौडी करिना कपूर-खान हिच्याकडे लागून राहिलेले आहे

सध्या संपूर्ण बॉलीवूड इंडस्ट्रीचे लक्ष बेगम आॅफ पतौडी करिना कपूर-खान हिच्याकडे लागून राहिलेले आहे. यासाठी की ती गरोदर आहे, असे कळाले होते. ते काही दिवसांपूर्वी लंडनच्या डॉक्टरांकडे गेले होते. त्यामुळे सर्वत्र चर्चेला उधाण आले होते. मात्र करिना आता म्हणतेय की, ‘त्या सगळ्या अफवाच होत्या. मी प्रेग्नंट नाही. मी एक स्त्री आहे. मला वाटणे साहजिकच आहे, पण सध्या काहीच बोलता येणार नाही. मला उत्साहित करण्यासाठी तुम्ही सर्व जण बोलत आहात. पण मला लंडनमध्ये काही मुले आहेत. वेल, तिने तरी बोलता बोलता म्हटले की, गॉड विलिंग होपफुली... म्हणजे लवकरच आपल्याला गुड न्यूज कळाल्याशिवाय राहणार नाही.