Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘इफ्फी’त डंका मराठीचा!

By admin | Updated: November 19, 2014 01:28 IST

गोव्यात २० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या ४५ व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आॅफ इंडिया (इफ्फी) या महोत्सवात इंडियन पॅनोरमा विभागात सात मराठी चित्रपटांना निवडले जाण्याचा मान मिळाला आहे

गोव्यात २० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या ४५ व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आॅफ इंडिया (इफ्फी) या महोत्सवात इंडियन पॅनोरमा विभागात सात मराठी चित्रपटांना निवडले जाण्याचा मान मिळाला आहे. तसेच नॉन फिचर विभागात तीन चित्रपटांची वर्णी लागली आहे. ‘अ रेनी डे’, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’, ‘लोकमान्य’, ‘किल्ला’, ‘एक हजाराची नोट’, ‘यलो’ आणि ‘एलिझाबेथ एकादशी’ या सात मराठी चित्रपटांना इंडियन पॅनोरमा विभागात निवडण्यात आलेले आहे. पॅनोरमाचा प्रारंभ करण्याचा मान ‘एलिझाबेथ एकादशी’ या चित्रपटाला मिळाला आहे. नॉन फिचर गटात विजू गोपाळ माने दिग्दर्शित ‘एक होता काऊ’, रवी जाधव यांचा ‘मित्रा’ आणि प्रसन्न श्रीकांत पांडे दिग्दर्शित ‘विठ्या’ या लघुपटांची निवड करण्यात आली आहे. पूर्वी या चित्रपट महोत्सवावर मल्याळी, बंगाली आदी अन्य प्रादेशिक चित्रपटांचा प्रभाव होता. आता आशयसंपन्न मराठी चित्रपट येत आहेत. त्याचे प्रतिबिंब ‘इफ्फी’त उमटत आहे, ही मराठी भाषिकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.