Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मराठी भाषेसाठी आपण नाहीतर कोण उभं राहणार", तेजस्विनी पंडित स्पष्टच बोलली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 15:36 IST

Tejaswini Pandit : तेजस्विनी पंडित नेहमी तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता अभिनेत्रीने मराठी भाषेवर मोठं वक्तव्य केलं आहे.

तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. लवकरच ती येरे येरे पैसा ३ सिनेमात दिसणार आहे. तेजस्विनी नेहमी तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता अभिनेत्रीने मराठी भाषेवर मोठं वक्तव्य केलं आहे.

तेजस्विनी पंडितने नुकतेच आरपार ऑनलाइनला मुलाखत दिली. तिने लिहिले की, ''राजकारण्यांना माणूस म्हणून बघितलंच जात नाही. म्हणजे कलाकारांनासुद्धा खूप वेळेला माणूस म्हणून ओळखलंच जात नाही. त्यांच्याविषयी विधानं केली जातात त्यांच्याविषयी वाट्टेल त्या भाषेत बोललं जातं. राजसाहेब राजकारणी म्हणून काय आहेत हे माझ्यासाठी मॅटर नाही करत. राजसाहेब माणूस म्हणून काय आहेत याच्याविषयी मी व्यक्त होते किंवा त्यांचा स्टॅण्ड कुठलाय त्याच्यासाठीचा तो जो जेव्हा तो स्टॅण्ड असतो. जेव्हा मला सपोर्ट करावासा वाटतो. तेव्हा मी तो सपोर्ट करते.''

''मराठी माझी मातृभाषा आहे...''

ती पुढे म्हणाली की, ''आज मराठीच्यासाठी ते जे उभे राहिलेले आहेत. हो. ते शंभर टक्के मला करणं भाग होतं आणि ते त्यांनी सांगितलं म्हणून मी केलेलं नाही. ते कधीच कोणाला सांगत नाहीत. तुम्ही हे करा हे मलाच वाटत होतं. कारण मी या क्षेत्रामध्ये काम करते. मराठी माझी मातृभाषा आहे. मी या राज्यात राहते आहे. मी या भाषेवरती गेली २२-२३ वर्ष स्वतःचं पोट भरते आहे. तर मी जर का या भाषेसाठी उभी नाही राहणार तर मग कोण राहणार.'' 

टॅग्स :तेजस्विनी पंडितराज ठाकरे