Join us
Daily Top 2Weekly Top 5

ओळखा पाहू हा कलाकार कोण आहे?

By admin | Updated: February 2, 2016 16:32 IST

या फोटोमधला कलाकार चांगला भरलेल्या गालांचा, टक्कल पडलेला सुखवस्तू आनंदी म्हातारा असा दिसत आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - या बातमीसोबत जो फोटो आहे, तो दुस-या तिस-या कुणाचा नसून चक्क ऋषी कपूरचा आहे. करण जोहर दिग्दर्शन करत असलेल्या कपूर अँड सन्समधल्या आपल्या अवताराचा हा फोटो ऋषी कपूरने शेअर केला असून, यामध्ये चांगला भरलेल्या गालांचा, टक्कल पडलेला सुखवस्तू आनंदी म्हातारा असं रूप दिसत आहे.
टीजर इमेज म्हणून या सिनेमासाठी हा फोटो चांगलंच निमित्त ठरेल असं दिसतंय कारण बॉलीवूडमधल्या अनेक सेलिब्रिटीजनी या अवताराची दखल घेतलीय. टि्वटरवर ऋषी कपूरचं हे रूप चांगलंच व्हायरल झालं असून माझ्यामागोमाग इतर कलाकारांचे अवतारही लवकरच बघायला मिळतिल असं टि्वट ऋषी कपूरनं केलंय.
या सिनेमात आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा आणि फवाद खान यांच्याही भूमिका आहेत.