Join us

मला विमान विकत घेण्याची इच्छा, पण पैसा नाही - शाहरुख खान

By admin | Updated: February 3, 2016 11:19 IST

बांद्रयातील मन्नत बंगला पाहिल्यानंतर त्याच्या ऐश्वर्याची प्रचिती येते. मात्र इतका पैसा असूनही अशा काही गोष्टी आहेत कि, ज्या शाहरुख विकत घेऊ शकत नाही.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई , दि. ३ - बॉलिवुडचा बादशहा शाहरुख खान आजच्या घडीला इंडस्ट्रीतला सर्वाधिक कमाई करणारा, मानधन घेणारा कलाकार आहे. त्याच्याकडे स्वत:च्या मालकीचा आयपीएलमधला एक संघ आहे, बांद्रयातील मन्नत बंगला पाहिल्यानंतर त्याच्या ऐश्वर्याची प्रचिती येते. मात्र इतका पैसा असूनही अशा काही गोष्टी आहेत कि, ज्या शाहरुख विकत घेऊ शकत नाही. 
मला स्वत:च्या मालकीचे विमान विकत घेण्याची इच्छा आहे मात्र माझ्याकडे तितका पैसा नाही. मी माझा सर्व पैसा चित्रपटांमध्ये लावतो. कामचा प्रचंड व्याप असल्यामुळे मला स्वत:च्या खासगी प्लेनमधून फिरण्याची इच्छा आहे. पण माझ्याकडे तितका पैसा नसल्यामुळे मी विमान विकत घेऊ शकत नाही. 
एकदिवस नक्की माझ्या मालकीचे विमान असेल. माझ्यासमोर नेहमीच विमान विकत घेण्याचा आणि चित्रपट बनवण्याचा पर्याय असतो पण मी चित्रपटांची निवड करतो असे शाहरुखने सांगितले. ५० वर्षाचा शाहरुख मागच्या दोन दशकांपासून बॉलिवूडमध्ये काम करत आहे.