Join us
Daily Top 2Weekly Top 5

सिंगल असण्याची भीती मला आवडते - सलमान खान

By admin | Updated: February 17, 2016 02:07 IST

तरुणाईच्या हृदयाची धडकन सलमान खान. तो सध्या बॉलीवूडमधील सर्वांत पात्र बॅचलर आहे. तो कधी लग्न करणार हा उत्सुकतेचा विषय आहे. पण अधूनमधून तो असे काही कमेंट्स करतो की

तरुणाईच्या हृदयाची धडकन सलमान खान. तो सध्या बॉलीवूडमधील सर्वांत पात्र बॅचलर आहे. तो कधी लग्न करणार हा उत्सुकतेचा विषय आहे. पण अधूनमधून तो असे काही कमेंट्स करतो की, त्यामुळे सर्वच जण शॉक होतात. तो म्हणतो,‘ मला सिंगल असण्याची भीती तर वाटते पण ती भीती मी एन्जॉय करतो.’ ‘फिअर व्हर्सेस नीरजा’ या सोनम कपूरच्या सोशल मीडियावरील कॅम्पेनवर सलमान खानने कमेंट केली की,‘ मला मी बॅचलर असण्याची जास्त भीती वाटते. अजून काही काळ मला जर बॅचलर राहता आले तर आवडेलच. सलमान आगामी चित्रपट यशराज फिल्मस च्या ‘सुल्तान’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. यात तो सुल्तान अली खान या पहेलवानाची भूमिका साकारतोय.