Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्टारडम एन्जॉय करतेय-अभिनेत्री वरिना हुसैन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 18:57 IST

, ‘लवयात्री’ या आगामी चित्रपटात अभिनेत्री वरिना हुसैन ही अभिनेता आयुष शर्मा याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आयुष शर्मा हा सलमान खानचा मेहुणा असून त्याचा देखील हा पहिलाच चित्रपट आहे.

तेहसीन खान

डेअरी मिल्क सिल्कची जाहीरात आठवतेय? त्यातील युवती आता अभिनेत्री बनली आहे. होय, ‘लवयात्री’ या आगामी चित्रपटात अभिनेत्री वरिना हुसैन ही अभिनेता आयुष शर्मा याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आयुष शर्मा हा सलमान खानचा मेहुणा असून त्याचा देखील हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने वरिना बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. तिच्याशी मारलेल्या या गप्पा....

 * आत्तापर्यंतच्या तुझ्या प्रवासाविषयी काय सांगशील? अभिनयक्षेत्राकडे कशी वळलीस?- मी गेल्या १० वर्षांपासून भारतात राहत आहे. माझं हिंदी शब्दोच्चार फार काही विशेष नाहीत. मी सर्वप्रथम त्यावर काम केलं. माझा आत्तापर्यंतचा प्रवास खूपच अनोखा राहिलेला आहे. माझे शिक्षण सर्वसामान्य शाळांमधून न होता मुक्त शाळांमधून झाले आहे. मी मॉडेलिंगपासून माझ्या करिअरला सुरूवात केली. छोटया जाहिरातींचे शूटिंग मी करायला सुरूवात केली. मग मला समाधानकारक फी मिळू लागली. मला खूप आनंद झाला होता. त्यानंतर मला मोठमोठया जाहीराती मिळू लागल्या. मला जेव्हा चित्रपटाचा प्रस्ताव आला तेव्हा मला हे सलमान खानचे प्रोडक्शन हाऊस आहे हे माहित नव्हते. पण, जेव्हा मला प्रस्ताव आला तेव्हा मात्र आनंदाने माझे पाय जमिनीवरच नव्हते. 

* ‘लव्हयात्री’ चित्रपटाचा प्रस्ताव सलमान खानमुळे स्विकारलास का?- मला ‘लव्हयात्री’ पूर्वीही अनेक चित्रपटांसाठी बाद केले गेले. मी एका चित्रपटाची शूटिंगही करत होते, पण त्याचे शूटिंग दोन  दिवसांत बंद पडले. पण, या चित्रपटाच्या बाबतीत तसे झाले नाही. सलमान खान या चित्रपटाच्या टीममध्ये असल्याने मी कोणताही विचार न करता चित्रपटासाठी होकार कळवला. 

* सलमान खानकडून तू शिकलेली एक गोष्ट कोणती?- ते खूपच मेहनती, सकारात्मक, प्रामाणिक असे कलाकार आहेत. त्यांचे व्यक्तिमत्त्व खूपच चार्मिंग  आहे. ते मला कायम म्हणतात, ‘वरिना डोन्ट वरी ना’ त्यांनी मला सांगितले की, तू पूर्ण जीव ओतून या चित्रपटासाठी काम कर, तुला नक्कीच यश मिळेल.

* तू अफगाणिस्तानची आहेस. तुला तुझ्या घराची आठवण येते का?- भारत हेच आता माझे घर आहे. पण कधीकधी मला नक्कीच अफगाणिस्तानची आठवण येते. जास्त प्रमाणात मी अफगाणिस्तानला राहिलेली नाहीये. भारतात मी जास्त वास्तव्यास राहिली आहे. मुंबईतच मला ४ वर्ष झाले आहेत. तर मी मुंबईत बरीच कम्फर्टेबल आहे.

 * तुला मिळणाऱ्या प्रतिसादाविषयी काय सांगशील?- नक्कीच. खूप छान वाटते. एवढं प्रेम जेव्हा मिळतं तेव्हा खूप आनंद होतो. सगळे आॅटोग्राफ, फोटो मागतात. असं वाटतं की, हा माझा डेब्यू चित्रपट नाही. एक मेसेज आला की, काही मुली या माझ्यामुळे प्रभावित झाल्या आहेत. तेव्हा खरंच खूप प्रेरणा मिळते.

* इंडस्ट्रीत तुला कुणासोबत अजून काम करायला आवडेल?- मला दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करायला आवडेल. ते खूपच क्रिएटिव्ह आणि मेहनती आहेत. मी इंडस्ट्रीत नवीन आहे त्यामुळे अजून ठरवू शकत नाही. त्याशिवाय मला अ‍ॅक्शन या प्रकारात काम करायलाही आवडेल. 

टॅग्स :सलमान खानमुलाखत