Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तिला तिथे पाहण्याची माझी अजिबात इच्छा नाही', तापसी पन्नूचे कंगना राणौतला सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 13:24 IST

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आणि कंगना रनौत यांच्यात नेहमीच वाद होताना दिसतात.

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आणि कंगना रनौत यांच्यात नेहमीच वाद होताना दिसतात. कंगना आणि तिची बहीण रंगोली चंडेल बऱ्याचदा तापसीवर निशाना साधताना दिसतात. त्यावर तापसीदेखील गप्प न बसता त्यांना सडेतोड उत्तर देताना दिसते. आता पुन्हा एकदा तापसी पन्नूने तिला उत्तर दिले आहे. ट्विटरवर कंगनाची अजिबात आठवण येत नाही आणि तिच्यासाठी कंगना महत्वाची नाही, असे तापसीने म्हटले आहे.

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, कंगना राणौतला ट्विटरवर टाकलेल्या बंदीवर तापसी पन्नूने प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली की, मला तिची अजिबात आठवण येत नाही आणि तिला पुन्हा एकदा तिकडे पाहण्याची इच्छा नाही. माझ्या वैयक्तिक आयुष्यात तिला काहीच महत्व नाही. ती एक कलाकार आणि आदरणीय सहकारी आहे पण त्यापेक्षा माझ्या आयुष्यात तिला जास्त महत्व नाही. मला तिच्याबद्दल चांगली किंवा वाईट भावना नाही.

तापसी पुढे म्हणाली, “जर तुम्हाला कोणी आवडत नसेल तर ते आपल्या मनापासून येते. मात्र यापेक्षाही वाईट बाब म्हणजे आपल्याला त्याचा काहीच फरक पडत नाही. कारण आपण त्यांना तेवढे महत्व देत नाही. जे आहे ते आहे मला अजिबात फरक पडत नाही.”

काही दिवसांपूर्वी कंगनाची बहीण रंगोली चंडेलने सोशल मीडियावर तापसीवर निशाना साधला होता. तापसी पन्नूने तिच्या रशियाच्या व्हॅकेशनमध्ये साडी नेसली होती. त्याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यावर रंगोली म्हणाली होती की ‘तापसीने पुन्हा एकदा कंगनाला कॉपी केले आहे.’ तापसी कंगनाची क्रीपी फॅन असल्याचेही रंगोलीने म्हटले होते. या आधी तिने तापसीला कंगनाची सस्ती कॉपी असेही संबोधले होते. 

तापसी पन्नूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर ती लवकरच ‘हसीन दिलरुबा’, ‘रश्मि रॉकेट’, ‘शाबाश मिठु’, ‘लूप लपेटा’, ‘दोबार’ आणि ‘वो लडकी’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. 

टॅग्स :कंगना राणौततापसी पन्नू