Join us
Daily Top 2Weekly Top 5

'दोन दिवस मी खूप रडले'; कपड्यांमुळे ट्रोल झाली अपूर्वा नेमळेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 18:52 IST

Apurva Nemlekar: 'लोकांनी मला अगदी सोललेली कोंबडी वगैरे म्हटलं होतं', असं म्हणत अपूर्वाने सांगितला तो किस्सा

'आभास हा' या मालिकेतून मराठी कलाविश्वात पदार्पण करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. पहिल्याच मालिकेमुळे लोकप्रिय झालेल्या अपूर्वाला खरी ओळख 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेमुळे मिळाली. या मालिकेत तिने साकारलेली शेवंता प्रचंड हिट झाली. या मालिकेनंतर अपूर्वाच्या लोकप्रियतेत झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे तिच्यावर कायम कौतुकाचा वर्षाव होत असतो. मात्र, काही वेळा तिला टीकेलाही सामोरं जावं लागतं. याविषयी

अलिकडेच तिने लोकमत फिल्मीला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने ट्रोलिंगच्या आलेल्या अनुभवावर भाष्य केलं.अपूर्वाने अलिकडेच लोकमत फिल्मीच्या My 1st या सेगमेंटमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने तिच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच कोणकोणत्या गोष्टींना सामोरी गेली हे सांगितलं. हेच सांगत असताना तिचा पहिला फसलेला आऊटफिट कोणता होता हे सांगितलं. तसंच या कपड्यांमुळे तिला नेटकऱ्यांनी कशा प्रकारे ट्रोल केलं हेदेखील सांगितलं.

अपूर्वाने झी चित्रगौरव पुरस्कारसाठी एक परफॉर्मन्स केला होता. यावेळी तिने परिधान केलेल्या कपड्यांमुळे तिला ट्रोल करण्यात आलं होतं. "मी झी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्यासाठी एक परफॉर्मन्स केला होता. ज्यात मला गोल्डन रंगाचा ड्रेस देण्यात आला होता. हा ड्रेस माझ्या चेहऱ्याच्या रंगाशी इतका मिळता जुळता होता की लोकांनी मला चक्क ट्रोल केलं होतं. मला खूप निगेटिव्ह कमेंट्स आल्या होत्या. अगदी सोललेली कोंबडी वगैरे लोकांनी मला म्हटलं होतं. त्यामुळे मी दोन दिवस खूप रडले होते", असं अपूर्वा म्हणाली.

दरम्यान, या गेममध्ये अपूर्वाने तिच्या वैयक्तिक जीवनाविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. यात फसलेला पहिला पदार्थ, तिचा शाळेतील क्रश वगैरे यांवर तिने भाष्य केलं. 

टॅग्स :अपूर्वा नेमळेकररात्रीस खेळ चालेसेलिब्रिटीटेलिव्हिजन