प्रियांका चोप्रा हिचे करिअर स्वप्ननगरी मुंबईतच आकारास आले. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांप्रमाणे आजही प्रियांका चोप्रा मुंबईवर प्रचंड प्रेम करते. सध्या ती अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’ च्या दुसऱ्या सीजनचे शूटिंग करत आहे. पण, ती म्हणते, ‘‘सध्या मी अमेरिकेत जरी असले तरीही मी केवळ एक भारतीय आहे. अमेरिकन भारतीय मी कधीच नसणार. माझ्यासाठी पैसा महत्त्वाचा नाही. मी जे काम करते त्यासाठी मी केवळ फी घेते. त्यासाठी मी प्रचंड मेहनत घेते. मी जेव्हा शाळेत जात असे तेव्हा टीव्हीवर कुठलाही भारतीय कलाकार मालिकांमध्ये दिसायचा नाही. पण, मला आनंद होतोय की, माझ्या निमित्ताने तरी भारतीय कलाकाराचा झेंडा उंचावला. मला मी भारतीय असण्याचा प्रचंड अभिमान आहे. त्यामुळे मला अमेरिकन भारतीय होण्याची मुळीच इच्छा नाही.’
‘मी केवळ भारतीय, अमेरिकन नव्हे..’
By admin | Updated: September 23, 2016 03:46 IST