Join us

हुमा बनणार 'गॉँव की गोरी'

By admin | Updated: September 12, 2014 05:44 IST

आजवरच्या बॉलीवूड करिअरमध्ये हुमा कुरैशीने वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका निभावल्या आहेत. त्यामुळेच आता दिग्दर्शकही तिच्याकडे वेगवेगळ्या भूमिका घेऊन जात आहेत.

आजवरच्या बॉलीवूड करिअरमध्ये हुमा कुरैशीने वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका निभावल्या आहेत. त्यामुळेच आता दिग्दर्शकही तिच्याकडे वेगवेगळ्या भूमिका घेऊन जात आहेत. दिग्दर्शकांसोबत बॉलीवूडच्या अभिनेत्यांनाही हुमासोबत काम करण्याची इच्छा आहे. त्यामुळे आयुष्मान खुराणाने त्याच्या व्हिडिओ अल्बमसाठी हुमाची निवड केली आहे. 'मिट्टी दी खुशबू' या व्हिडिओ अल्बममध्ये हुमा 'गाँव की गोरी' अवतारात दिसणार आहे. हा व्हिडिओ मुंबई आणि थायलंडमध्ये शूट होणार असून, अमित रॉय दिग्दर्शन करणार आहेत. या वर्षाच्याअखेरीस हा अल्बम रिलीज होण्याची शक्यता आहे.