आपल्या सर्व चित्रपटांतील लूकसाठी अभिनेता हृतिक रोशन हा कठोर मेहनत घेत असतो. भूमिका कशीही असो, त्याकडे गंभीरतेने पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन असतो. ‘मोहंजोदडो’ हा हृतिकचा आगामी चित्रपट आहे. या चित्रपटात तो एक योद्धा बनणार आहे. योद्धा दिसण्यात कसलीही खोट राहू नये, यासाठी तो कठोर परिश्रम घेत आहे. त्यासाठी विशेष फिटनेस प्रशिक्षण घेण्यास त्याने सुरुवात केली आहे. हृतिक हा पूर्वी सायंकाळी व्यायाम करीत असे, आता पहाटे- पहाटे व्यायाम करण्यावर तो भर देत आहे. व्यायामात त्याने अनेक बदलदेखील केले आहेत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}