Join us

हृतिकही होता अक्षयच्या पार्टीत?

By admin | Updated: September 2, 2016 03:15 IST

एकाच वर्षांत रीलीज झालेल्या ‘रूस्तम’, ‘एअरलिफ्ट’ आणि ‘हाऊसफुल्ल ३’ या चित्रपटांच्या एकापाठोपाठ यशानंतर आता बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा खूपच आनंदात आहे.

एकाच वर्षांत रीलीज झालेल्या ‘रूस्तम’, ‘एअरलिफ्ट’ आणि ‘हाऊसफुल्ल ३’ या चित्रपटांच्या एकापाठोपाठ यशानंतर आता बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा खूपच आनंदात आहे. त्याने त्याचे बॉलीवूडमधील मित्र, कलाकार यांच्यासाठी एक पार्टी आयोजित केली होती. त्यात ‘बी टाऊन’चे सर्व कलाकार उपस्थित होते. आश्चर्याची बाब म्हणजे ‘रूस्तम’सोबत बॉक्स आॅफिसवर संघर्ष केलेला चित्रपट ‘मोहेंजो दाडो’चा मुख्य कलाकार हृतिक रोशनदेखील या पार्टीत आला होता. हृतिक आणि अक्षय या दोघांमध्ये कलाकार म्हणून मित्रत्वाचे नाते आहे. ‘मोहेंजो दाडो’च्या अपयशानंतरही हृतिकला अक्षयच्या पार्टीत जावे वाटले हे काही कमी आहे का? म्हणतात ना, ‘स्वत:चे अपयश विसरून जो दुसऱ्याच्या यशात सहभागी व्हायला जातो तोच खरा कलाकार!’ अक्षय-हृतिक हे दोघेही एकाच बिल्डिंगमध्ये राहतात. त्यामुळे कदाचित हृतिकला अक्षयच्या पार्टीत जायला वावगे वाटले नसेल.