Join us

हृतिकने कुणालच्या चित्रपटाचा ट्रेलर केला फेसबुकवर शेअर

By admin | Updated: February 14, 2017 15:07 IST

अभिनेता कुणाल कपूरच्या मल्याळम 'वीरम' या चित्रपटाचा पहिला ट्रेलर रिलीज झाला आहे. दरम्यान, कुणालचा मित्र अभिनेता हृतिक रोशनने या चित्रपटाचा ट्रेलर फेसबुकवर शेअर केला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - अभिनेता कुणाल कपूरच्या मल्याळम 'वीरम' या चित्रपटाचा पहिला ट्रेलर रिलीज झाला आहे. दरम्यान, कुणालचा मित्र अभिनेता हृतिक रोशनने या चित्रपटाचा ट्रेलर फेसबुकवर शेअर केला आहे. 
सध्या बॉलिडूमधील कलाकार एकमेकांच्या चित्रपटाचे पोस्टर किंवा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. गेल्या काही दिवसापूर्वी अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खान यांनी एकमेकांच्या चित्रपटांचे पोस्टर ट्विट केले होते. तसेच, हृतिक रोशनने सुद्धा कुणालच्या चित्रपटाचा ट्रेलर फेसबुकवर शेअर केला आहे. याबद्दल कुणालने  हृतिक रोशनचे ट्विटरवर आभार मानले आहेत. 
दरम्यान,शेक्सपियर लिखित जगविख्यात नाटक ‘मॅकबेथ’वर आधारित असलेल्या 'वीरम' या चित्रपटात तेराव्या शतकातील केरळमधील योद्धा चंदू चेकवरच्या भूमिकेत कुणाल कपूर दिसणार आहे. हा चित्रपट येत्या २४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.