Join us

मुक्ता बर्वेसोबत हृतिक रोशनचे मराठीत पदार्पण

By admin | Updated: March 2, 2017 10:29 IST

विख्यात फॅशन डिझायनर विक्रम फडणीसच्या'हृदयांतर' या मराठी चित्रपटात हृृतिक रोशन विशेष भूमिकेत दिसणार आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - प्रियांका चोप्रा, सलमान खान, जॅकी श्रॉफ, विद्या बालन, हुमा कुरेशी या कलाकारांपाठोपाठ बॉलिवूडचा आणखी एक प्रसिद्ध चेहरा मराठी चित्रपटात दिसणार आहे. आणि तो अभिनेता म्हणजे बॉलिवूडचा सुपरहिरो अभिनेता हृतिक रोशन.. विख्यात फॅशन डिझायनर विक्रम फडणीस ' हृदयांतर' या मराठी चित्रपटातून दिग्दर्शनात पाऊल टाकत असून याच चित्रपटात हृतिकची विशेष भूमिकेत झळकणार आहे. खुद्द हृतिकनेच ट्विटरवरून याची माहिती दिली असून त्याने विक्रम आणि मुक्ताबर्वेसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. 
'हृदयांतर' या चित्रपटात गुणवंत अभिनेत्री मुक्ता बर्वे तसेच सुबोध भावे याची मुख्य भूमिका आहे.. काही महिन्यांपूर्वी बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान या चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला होता.