Join us
Daily Top 2Weekly Top 5

Sexiest Asian Male 2019 : ‘हा’ बॉलिवूड अभिनेता ठरला सेक्सी नंबर 1 !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 11:26 IST

जगभरातील चाहत्यांनी केलेल्या मतदानानंतर टॉप 50 सेक्सी पुरूषांची यादी तयार करण्यात आली.

ठळक मुद्देआशियातील सर्वाधिक सेक्सी पुरूषाचा बहुमान मिळाल्यानंतर हृतिकने चाहत्यांचे आभार मानले आहेत.

या दशकातील आशियामधील सर्वाधिक सेक्सी पुरूष कोण? या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे. होय, तरूणींच्या गळ्यातील ताईत असलेला सुपरस्टार हृतिक रोशन याने आशियातील सर्वाधिक लोकप्रिय सेक्सी पुरूषाचा बहुमान पटकावला आहे. केवळ 2019 चा नाही तर या दशकातील आशियामधील सर्वाधिक सेक्सी पुरूष म्हणून हृतिकची निवड झाली आहे.

ब्रिटनमधील ‘इस्टर्न आय’ या साप्ताहिकाने केलेल्या सर्वेक्षणानुसार, हृतिक केवळ यंदाचा नाही तर या दशकातील सर्वाधिक सेक्सी आशियायी पुरूष ठरला आहे. जगभरातील चाहत्यांनी केलेल्या मतदानानंतर टॉप 50 सेक्सी पुरूषांची यादी तयार करण्यात आली आहे. या यादीत ग्रीक गॉड हृतिक पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.

अभिनेता शाहिद कपूर या यादीत दुस-या क्रमांकावर आहे. 

टीव्ही अभिनेता विवियन डिसेना तिस-या क्रमांकावर तर अ‍ॅक्शन हिरो टायगर श्रॉफ चौथ्या क्रमांकावर आहे.

पाकिस्तानी वंशीय ब्रिटीश गायक जायन मलिक या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. भारतीय क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातील ताईत विराट कोहली या यादीत सातव्या क्रमांकावर आहे.आशियातील सर्वाधिक सेक्सी पुरूषाचा बहुमान मिळाल्यानंतर हृतिकने चाहत्यांचे आभार मानले आहेत. मला मते देणा-यांचे आभार. कुठल्याही व्यक्तितील कुठली गोष्ट आकर्षित करते, असे विचाराल तर माझ्या मते, त्या व्यक्तिची कहाणी, प्रवास आणि स्वभाव, ज्याद्वारे तो आयुष्यातील विविध परिस्थितींचा सामना करतो. या अनुषंगाने निश्चित मार्ग निवडणे, माझ्या कामाचा भाग आहे. यासाठी निरंतर प्रयत्न आणि कष्ट करावे लागतात, असे हृतिकने म्हटले आहे. हृतिकचा ‘वॉर’ हा सिनेमा अलीकडेच प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर बक्कळ कमाई केली.

टॅग्स :हृतिक रोशनशाहिद कपूरटायगर श्रॉफ