Join us

हृतिक रोशन कॉमेडी भूमिका करण्यास इच्छूक

By admin | Updated: April 26, 2016 17:55 IST

बॉलिवूडचा अभिनेता हृतिक रोशनने आता कॉमेडी चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बॉलिबूडच्या अनेक चित्रपटामध्ये रोमॅंटिक,अॅक्शन भूमिकेच्या जोरावर

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - बॉलिवूडचा अभिनेता हृतिक रोशनने आता कॉमेडी चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 
बॉलिवूडच्या अनेक चित्रपटामध्ये रोमॅंटिक,अॅक्शन भूमिकेच्या जोरावर आपली छाप सोडणा-या ह्रतिक रोशनने आगामी चित्रपट 'हाउसफुल-३' चा ट्रेलर पाहिला.  त्याला 'हाउसफुल-३' या चित्रपटाचा ट्रेलर आवडला असून त्याने सुद्धा आता कॉमेडी चित्रपटात काम करण्याची इच्छा ट्विटरवरुन व्यक्त केली आहे.
'हाउसफुल-३' हा चित्रपट येत्या ३ जूनला प्रदर्शित होणार असून यामध्ये अभिनेता अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख,नर्गिस फाखरी, जॅकलीन फर्नांडीस आणि लिसा हेडन यांनी भूमिका साकारल्या आहेत.