Join us
Daily Top 2Weekly Top 5

ह्रतिक रोशन स्टारर काबीलचा दमदार ट्रेलर रिलीज

By admin | Updated: October 26, 2016 12:19 IST

ह्रतिक रोशन स्टारर काबील चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ह्रतिक आणि यामी गौतम यांनी आपल्या टविटर अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 24 - ह्रतिक रोशन स्टारर काबील चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ह्रतिक आणि यामी गौतम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती दिली.  काबील चित्रपटाची कथा रोहण भटनाकरची आहे. तो आणि त्याची प्रेयसी दोघेही अंध असतात. एका घटनेमुळे त्यांच्या आयुष्यात होणारा उलटफेर आणि त्यानंतर भटनाकरचा बदला असं कथानक असल्याचे ट्रेलरवरून दिसचं आहे. ह्रतिकने मुख्य भुमिका साकारली आहे. तर संजय गुप्ता यांनी दिगदर्शनांची जबाबदारी पेलली आहे. 
 
काबील चित्रपटात ह्रतिक रोशन आणि यामी गौतम मुख्य भुमिुकेत आहेत. दोघांनीही अंधांची भूमिका निभावली आहे. दृष्टिहीन प्रेमीयुगुलींची प्रेमकथा या सिनेमात दाखवण्यात आली आहे. 26 जानेवारीला चित्रपट प्रदर्शित होणार असून संजय गुप्ता यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.